Ram Shinde came to the constituency and said, 'I did not bother, now I have to fight 
पश्चिम महाराष्ट्र

आले आले राम शिंदे मतदारसंघात आले...म्हणाले, आता लढायचं

सकाळ वृत्तसेवा

कर्जत: विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे काहीसे नाराज झाले होते. मतमोजणीनंतर मतसंघापासून दुरावले होते. मोजक्या पदाधिकार्‍यांव्यतिरिक्त ते कोणाच्या संपर्कातही नव्हते. त्यांनी बिऱ्हाडही पुण्याला हलवले होतं. मतदारसंघात अपवाद वगळातच दिसले. मध्यंतरी त्यांनी विजयी उमेदवार रोहीत पवार यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले.

तेव्हापासून ते थोडे सक्रिय झाले. ते सक्रिय झाल्याने कार्यकर्तेही उल्हासित झाले आहेत. आज त्यांनी सर्व संभ्रम दूर करीत आपली भूमिका स्पष्ट केली. आता लढायचं असे म्हणाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गोटात उत्साहाचं वारं शिरलंय.

आतापर्यंत मला जे मिळाले, ते जनतेने दिले. याबाबतीत मी समाधानी आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आणि राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यात कर्जत-जामखेडमधील सर्वांचेच योगदान आहे. मी थकलो नाही आणि मनाने तर अजिबात खचलो नाही, असे प्रतिपादन माजी राम शिंदे यांनी केले. 


सद्‌गुरू संत गोदड महाराज मंदिरात शिंदे व युवा उद्योजक संतोष धुमाळ यांच्या हस्ते माध्यान्ह आरती घेण्यात आली. त्या वेळी शिंदे बोलत होते. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, रोजगार हमी समितीचे काका धांडे, उपाध्यक्ष सतीश पाटील, यशवंत शिक्षण संस्थेचे आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. 


शिंदे म्हणाले, की माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे. ती कायम राहील. समर्थकांनी काही काळजी करू नये, सर्व व्यवस्थित होईल. जनतेचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या संघर्षात सहभागी होऊ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT