rani channamma university sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव - विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, पदवी परीक्षा २१ मार्चपासून

राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे.

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाने (Rani Chanamma University) (आरसीयु) पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे (Students) परीक्षेचे वेळापत्रक (Exam Time Table) दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. वेळापत्रकानुसार २१ मार्चपासून परीक्षा (Exam) होणार आहेत. मात्र, तिन्ही वर्षातील विद्यार्थ्यांच्या एकाचवेळी परीक्षा होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे हे वेळापत्रक तात्पुरते असल्याने या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांसमोर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी हेच वेळापत्रक अंतिम समजून अभ्यास करावा, अशा सुचनाही महाविद्यालयांतून केल्या जात आहेत.

विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक संबंधीत महाविद्यालयांना पाठविले आहे. विद्यार्थ्यांकडून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, स्टुडंट पोर्टलवर ते वेळापत्रक नसल्याने विद्यार्थ्यांनाही चिंता आहे. यामुळे हे वेळापत्रक बदलणार असल्याचेही विद्यार्थ्यांतून बोलले जात आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २१ मार्चपासून १० एप्रिलपर्यंत परीक्षा होणार आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत.

यंदा पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना राष्‍ट्रीय शिक्षण धोरण लागू केले आहे. तसेच त्यांना नुकताच विषय बदलून दिला असल्याने त्यांचे इंटरनल मार्क नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे विद्यापीठाने पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. यापूर्वी पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच कालावधीत झाल्या आहेत. मात्र, यावेळीही तशा होण्याची शक्यता आहे. मात्र, पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक जाहीर नसल्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा २८ फेब्रुवारीपासून पदवीच्या परीक्षा होणार होत्या. मात्र, त्या पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, आता २१ मार्चपासून या परीक्षांचे नियोजन केले आहे.

महाविद्यालयात परीक्षाचा माहोल

पदवीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत. नोट्सची जुळवाजुळव केली जात आहे. तसेच काही दिवसात प्रवेशपत्र (हॉलतिकीट) देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे एकमेकाशी फोनवरुन संपर्क साधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT