Rani Mukherjee, Shilpa Shetty said to Sai Thanks BABA 
पश्चिम महाराष्ट्र

राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी साईंना का म्हणाल्या, थॅंक क्‍यू बाबा 

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोन्ही अभिनेत्रींची मनोकामना साईबाबांनी नव्या वर्षात पूर्ण केली. तब्बल बारा वर्षांच्या कालखंडानंतर शिल्पाचे निकम्मा व हंगामा हे दोन चित्रपट येत आहेत. अभिनेत्री राणीचा मर्दानी-2 हा चित्रपट नव्या वर्षात प्रदर्शित झाला. याबद्दल साईंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आधी राणीने आणि परवा शिल्पाने साईंच्या दरबारात हजेरी लावली. साईबाबांविषयी आदरभाव प्रकट केला. 
अभिनेत्री राणी व तिचे वडील राम मुखर्जी यांची साईबाबांच्या शिर्डीत बंगला बांधण्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी येथे अकरा गुंठे जमिन खरेदी केली. मात्र ही जमीन बिगरशेती आहे की नाही या कारणावरून वाद निर्माण झाला. उच्च न्यायालयात चार वर्षे वाद सुरू होता. दोन वर्षापूर्वी मुखर्जी कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले. मात्र, काही दिवसांपूर्वी राम मुखर्जी यांचे निधन झाले. आता राणी येथे बंगला बांधणार का? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 


अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील निस्सीम साईभक्त. ती तब्बल बारा वर्षे चित्रपटसृष्टीच्या बाहेर होती. आता दूरचित्रवाणीवरील सुपर डान्सर या शोमध्ये नृत्य करते. शिवाय तिचे एकापाठोपाठ एक दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणार साईबाबांचे साथ असते, अशा शब्दात तिने परवा बाबांविषयी आदरभाव व्यक्त केला. 

मी नाही दिला सुवर्ण मुकूट 
शनिवारी (ता.25) अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या कुटूंबियां समावेत साईदर्शन घेतले. यावेळी तिला साईसंस्थान च्या वतीने संगमरवरी मूर्ती भेट देण्यात आली. या भेटीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईमंदिरातील साईबाबांच्या मुर्तीसाठी सुवर्ण मुकूट भेट दिला नाही. असे तिच्या निकटवर्तीयांनी तसेच साईसंस्थानच्या वतीने सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT