rape case in 2017 five people life imprisonment punishment from court in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

तीन वर्षापूर्वी घडलेल्या बलात्कार प्रकरणी बेळगावात पाचही आरोपींना जन्मठेप

महेश काशीद

बेळगाव : मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार प्रकरणांतील सर्व पाचही आरोपींना तृतीय जिल्हा आणि सत्र (विशेष पोक्‍सो) न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजू सिद्धाप्पा दड्डी (वय 24), सुरेश भरमाप्पा बेळगावी (वय 24), सुनील लगमाप्पा डूमगोळ (21, तिघेही रा. मुत्यानट्टी, ता. बेळगाव) आणि महेश बाळाप्पा शिवणगोळ (23, रा. मणगुत्ती, ता. हुक्केरी) व सोमशेखर दूरदुंडेश्‍वर शहापूर (23, रा. बैलहोंगल) अशी त्यांची नावे आहेत.

अल्पवयीन आरोपी मुत्यानट्टीमधील सामुहिक बलात्कार खटल्यामध्ये सहा आरोपी आहेत. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्या विरोधातील दावा बाल न्यायालयात सुरु आहे. उर्वरित 5 जण हे वीसहून अधिक वयाच्या असल्यामुळे त्यांच्या विरोधात विशेष पोक्‍सो न्यायालयात सुनावणी झाली. 

दरम्यान, दोषींपैकी मुख्य आरोपी संजू आणि सुरेशला 5 लाख 21 हजार, सुनील आणि महेशला 5 लाख 11 हजार व पाचवा आरोपी सोमशेखरला 5 लाख 6 हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे. बलात्कार प्रकरणांत एवढ्या मोठ्या स्वरुपात दंड ठोठाविल्याची बेळगावातील पहिली घटना ठरली. 

बेळगावात हॉस्टेल येथे अल्पवयीन युवती राहायला होती. 15 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीवरून ती फिरायला मुत्यानट्टी डोंगराकडे (वीजउत्पादन केंद्राजवळ) गेली होती. त्यांना संशयितांनी गाठले. अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण केली. मार्ग अडवून धरत फोन आणि तीनशे रुपयांची रोकड काढून घेतली. धाक दाखवून मुलीच्या मित्राला तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. संशयितांनी मुलीवर अत्याचार केले. घटनेची वाच्छता करू नये, पोलिसांकडे जाऊ नये. एखाद्यावेळी कोणी पोलिसांकडे गेल्यास कुटूंबाची खैर नाही, जिवे मारले जाईल, अशी धमकी दिली. तसेच 20 हजाराची मागणी केली. त्या दोघांनी सायंकाळी साडे सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत डांबून ठेवण्यात आले. यानंतर कोठेही वाच्छता न करण्याच्या अटीवर सोडून दिले. त्यावेळी पिडीत दुचाकीकडे जाण्यासाठी निघाले. अंधारातून मार्ग काढत दोघेही काकती राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-4) पोचले. 

खासगी वाहनाचा आधार घेऊन बेळगावला पोचले. त्यानंतर याविरोधात काकती पोलिसांमध्ये फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक रमेश गोकाक यांनी या घटनेची दखल घेत तपास सुरु केला. आरोपींना जेरबंद केले.  जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आणि गुरुवारी आरोपींना दोषी ठरविले. तर आज शिक्षा ठोठावली. त्यामध्ये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT