Rapid Action Force in Karjat 
पश्चिम महाराष्ट्र

आता शायनिंग करू नका... कर्जतला आले शिघ्र कृती दल

सकाळ वृत्तसेवा

कर्जत: लॉकडाऊन असतानाही काही टवाळखोर रस्त्यावर उतरत होते. काहींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते पोलिसांसोबत हुज्जत घालत होते. काहीजण तर उगाच इकडून तिकडे चकरा मारीत होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्जतला शिघ्र कृती दल पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे जास्तीचं शायनिंग करू नका नाही तर बाराच्या भावात जाल....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगा,घरातच थांबा या व इतर अनेक सूचना, आवाहन यांना दाद न देणाऱ्या कर्जत येथील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या टवाळखोराना जरब बसावी म्हणून आजपासून शहरातील सर्व प्रमुख मार्ग व चौकाचौकात दंगल नियंत्रक पथक तैनात केले आहे. ते खास त्यांच्या स्टाईलमध्ये रिकामटेकड्या व विनाकारण फिरणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देत धडा शिकवीत आहेत. त्या मुळे काही मिनिटांतच कर्जतच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

या वेळी या पथकासमवेत पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. गेल्या २२ तारखेपासून देशात लॉकडाऊन आहे. त्या मुळे सर्व व्यवहार बंद असून संचारबंदी सुरु आहे. मात्र काही टवाळखोर विनाकारण
घराबाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी आजपासून शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकाचौकात दंगल नियंत्रक पथक तैनात केले आहे. ते विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्याना छडीचा प्रसाद देण्याबरोबर कान धरून उठबशा काढणे, कान धरणे, तोंडात स्वतः
चापट मारून घेणे, पोटावर सरपटने या सारख्या शिक्षा देत आहेत. हे दंगल नियंत्रक पथक आल्याचे आणि त्यांची कार्यपद्धती काही मिनिटातच सोशल मीडियावर सगळीकडे पोहोचली.काही काळातच कर्जत शहरातील सर्व रस्ते जे काही वेळापूर्वी माणसाची वर्दळ सुरु
होती ते निर्मनुष्य झाले.

दंगल नियंत्रक पथक

कोरोना संसर्गामुळे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रक पथक पाचारण करण्यात आले आहे. या पथकात पंधरा पुरुष आणि नऊ महिलाचा समावेश आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलीस अधिकारी आहे. शहरातील चौकाचौकात आणि प्रमुख मार्गावर हे पथक तैनात राहील. तसेच तालुक्यातदेखील फिरती गस्त घालणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वाना मनाई असणार आहे. या काळात प्रत्येकाने आपले ओळखपत्र समवेत ठेवणे गरजेचे आहे.

-संजय सातव ,पोलीस उपाधीक्षक, कर्जत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT