पश्चिम महाराष्ट्र

ब्रेन हॅमरेजमुळे आईला झालेला त्रास मला सहन होईल का? पोलिसाने केले एव्हरेस्ट शिखर सर

महादेव अहिर -सकाळ वृत्तसेवा

वाळवा (सांगली) : ब्रेन हॅमरेजमुळे (Brain hemorrhage)आईला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना आपण सहन करू शकू का? या जिज्ञासेने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर(summit Mount Everest)सर करण्याचा निर्णय घेतला. हे करताना प्रत्येक पावलाला अंथरुणावर खिळलेली आई, तिने सहन केलेल्या वेदना डोळ्यांसमोर येत होत्या. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना समोर आईचा चेहरा दिसायचा. त्यामुळे मी मोहिमेत यशस्वी झालो, अशी भावना सांगली जिल्ह्यातील पहिले एव्हरेस्टवीर ठरलेले संभाजी नारायण गुरव यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. प्रत्येकाच्या आयुष्यात एक माऊंट एव्हरेस्ट शिखर असावे. ते सर करण्याची उमेदही पाहिजे, असेही ते म्हणाले.(rapid-Action-Force-Sub-Inspector-sambhaji-gurav-summit-of-Mount-Everest-completed-sangli)

संभाजी शीघ्र कृती दलात नवी मुंबईत उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बहुतांश मागास पडवळवाडीसारख्या छोट्या खेड्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पहिला मान त्यांच्या नावावर आहे. २०१० मध्ये त्यांची नेमणूक गडचिरोली येथे कमांडो १६ दलात झाली. सात नक्षलवाद्यांना त्यांनी ठार केलेय. त्याबद्दल २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीच्या शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पहिलीच नेमणूक गडचिरोलीत झाली. बहुतेक अधिकारी टाळाटाळ करतात. संभाजीने मात्र आनंद आणि धैर्याने हा भाग निवडला.मनाची तयारी असेल, तर प्रशासकीय सेवेसाठी गडचिरोलीसारखा दुसरा चांगला भाग नाही. या भागातील लोक गरीब पण प्रामाणिक आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मागास असले तरी प्रशासनाला नेहमीच सहकार्य करतात.

एव्हरेस्ट मोहिमेत गडचिरोलीत ज्या धैर्याने सेवा दिली ते धैर्य कामी आले, असे ते नमूद करतात. ६ एप्रिलला नेपाळमधून एव्हरेस्ट मोहीम सुरू केली. तिसऱ्या बेस कॅम्पवर गेल्यानंतर काही प्रमाणात मनाची चलबिचल झाली. अनंत वेदना झेलणारी आई समोर दिसली आणि नव्या दमाने प्रत्येक बेस कॅम्प सर करत गेलो. गेल्या आठवड्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा एव्हरेस्ट मोहिमेवर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाला. सर्वसाधारण ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाचे वारे एव्हरेस्टवर चढाईसाठी अनुकूल राहते. तौक्तेचा शेवट राजस्थानात झाला तरी त्याचा फटका माऊंट एव्हरेस्ट भागात जाणवला. तिथे वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटर पर्यंत पोहोचला. काहीसा वेळ वाया गेला. तीन दिवसांचा मुक्कामही वाढला, असे गुरव यांनी सांगितले.

परंपरा झुगारली, ध्येय ठेवले

२०१८ मध्ये आईचे निधन झाले. सामाजिक विरोध झुगारून संभाजी गुरव यांनी परंपरेनुसार कोणतेही विधी केले नाहीत. मनात खूणगाठ बांधली, की आईने जेवढ्या वेदना सहन केल्या तेवढ्या सहन करण्यासाठी एव्हरेस्ट सर करू. माझे यश पाहून आईलाही आनंद झाला असता, अशी त्यांची भावना आहे.

एव्हरेस्टपूर्वी महाराष्ट्रातील काही उंच शिखरे पार केलीत. येत्या वर्षभरात जगातील सात खंडात असणारी सात सर्वोच्च शिखरे सर करणार आहे.

- संभाजी गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT