पश्चिम महाराष्ट्र

रुग्णांना बसणार आर्थिक फटका; एचआरसिटी दरात पुन्हा वाढ

राज्य सरकारचे घुमजाव; सामान्य रुग्णांसाठी १,५०० ऐवजी २,५०० रुपये दर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : एचआरसिटी (HRCT) व डिजिटल एक्स रे चाचणीचा दर राज्यभरात (maharashtra - karnataka) समान असावा यासाठी सरकारने शनिवारी (८) आदेश दिला होता. मात्र, काही वेळातच घुमजाव करुन त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आधीच्या आदेशातील एचआरसिटीचा १,५०० रुपये दर केवळ बीपीएल कार्डधारक (BPL card) रुग्णांसाठी असून तर अन्य रुग्णांसाठी २,५०० रुपये दर निश्चित केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रुग्णांना पुन्हा आर्थिक (economy) फटका बसणार आहे.

कोरोना काळात विविध खासगी रुग्णालये (private hospitals) तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये एचआरसिटी व अन्य चाचण्यांसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे काही खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा अधिक दर घेत असल्याची तक्रार वाढली होती. यामुळे राज्य सरकारने (state government) राज्यभरातील सर्व खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांत एकच दर निर्धारित करुन शनिवारी दरपत्रकही जाहीर केले होते. मात्र, शनिवारी रात्रीच राज्य सरकारने ते मागे घेत चाचणी दरात काही प्रमाणात वाढ केली आहे‌. याआधी राज्यभरातील खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये एचआरसिटीसाठी १,५०० रुपये दर निश्‍चित केला होता. मात्र, आता तो २,५०० रुपये केला आहे.

सध्या कोरोना (covid-19) काळात एचआरसिटीला मागणी वाढली आहे. यामुळे बरीत खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये वाढीव दर आकारण्यात येत आहेत. आधी २ ते ३ हजार रुपये असलेला दर काही ठिकाणी ६ ते ८ हजारपर्यंत वाढविल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांना या तपासणीसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने शनिवारी राज्यभरातील सर्व खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांनी शासकीय रुग्णालयांप्रमाणे दर आकारावा, अशी स्पष्ट सूचना केली होती. मात्र, सरकारने शनिवारी रात्रीच आपल्या आदेशात बदल केल्याने गरीब व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसणार आहे. सरकारच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकार दबावाला बळी पडल्याची टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पप्पू यादवांचा पुजाऱ्याचा वेष अन् राहुल गांधींची श्रद्धाळूची भूमिका; संसदेतील 'त्या' प्रकारावर लोकसभा अध्यक्ष नाराज

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT