ganesh sangh.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सेकंड इनिंगमध्ये ते काय करतात वाचा..

सकाळवृत्तसेवा

सांगली- संध्याछाया भिवविती हृदया... निवृत्तीनंतर उतारवयाकडे जाताना तो प्रवास सुखद व्हावा, समाजपयोगी व्हावा. लोकांना स्वतःशी जोडून घेणारा व्हावा यासाठी येथील श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अखंड उपक्रम सुरू असतात. साठी ते नव्वदीपर्यंत दोनशेंवर सदस्य एकत्रितपणे या सर्व उपक्रमांसाठी हातभार लावत असतात. त्यामुळे ज्येष्ठांच्या या चमूची ओळख अखंड उपक्रमशील अशी झाली आहे. 

आयुष्यभर घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एकाकी पडतात. मन कशात तरी रमवण्यासाठी वेगवेगळ्या क्‍लब, संस्था, संघटनात काम करतात. त्याच धर्तीवर 2002 मध्ये दिवंगत अ. रा. जोशी, चि. श्री. गोखले व रा. वि. जळदकर आदींनी गावभागात या एका कट्टयावर या संघाची स्थापना केली. नि:स्वार्थी भावनेने उर्वरित आयुष्यात विधायक कार्य करण्याच्या हेतूने संघ कार्यरत आहे.

संघाचे सारेच उपक्रम जगण्याची नवी ऊर्मी देतात. 
दररोज पहाटे साडेसहापासून साडेसातपर्यंत गावभागातील विष्णूघाटावर हास्य क्‍लब भरवला जातो. निमिषा गांधी, चंद्रकांत संत सकाळी 6 ते 7 आदी बलभीम शाळेच्या टेरेसवर योग वर्ग घेतात. तिथंचे भिशी मंडळही चालवले जाते. विश्रामबाग येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज वृद्धाश्रम व कुपवाड येथील वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त वैचारिक फराळांची मेजवानी दिली जाते. वृद्धांशी हितगुज, गप्पा व त्यांचे अंतरंग जाणून घेत दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला जातो. 


वेलणकर अनाथ बालकाश्रमात दरवर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळ वाटप. कला, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, वैज्ञानिक कीर्तन, श्रीरामचरित्र वाचन असे उपक्रम होतात. जुलैमध्ये दहावी-बारावी यशवंताचा तसेच खेळाडूंचा गौरव होतो. आपल्याचा नातवंडांचं कौतुक करणारे सारे आजोबा पाहून मुलेही भारावतात. 1 ऑक्‍टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी पंचाहत्तरी पार करणाऱ्यांचा सत्कार होतो. कोजागरीला चार तासांची मनोरंजनाची मैफल होते. विविध विषयांवर वर्षभर व्याख्याने सुरू असतात. नव्वदीपार झालेले सदस्यही या उपक्रमात त्याच उत्साहाने सहभागी होतात. भान हरपून विविध कला-गुण सादर करतात. अखंडपणे न थकता उपक्रमांचा पाऊस सुरू असतो. हेच या चमूचे वैशिष्टय आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT