Rebellion in BJP in shrigonde 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यात भाजपमध्ये फूट?

संजय आ. काटे

श्रीगोंदे : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत येत्या मंगळवारी (ता. सात) काठावरचे बहुमतात असलेल्या सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची शक्‍यता आहे. त्यांचा गटनेता अपात्र ठरला असतानाच, आता एक सदस्य विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गळाला लागला आहे. त्यामुळे पंचायत समितीत सत्ता राखणे भाजपला कठीण झाले आहे. दरम्यान, "आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ,' असा दावा भाजप करीत आहे. 

पंचायत समितीच्या नव्या कारभाऱ्यांची निवड मंगळवारी होत आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 12पैकी सात जागा जिंकून काठावरची सत्ता मिळविली. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांचे गटनेते अमोल पवार हेच जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने अपात्र ठरले. त्यामुळे त्यांच्याकडे "व्हीप' बजावण्यासाठी आज तरी गटनेता नाही. परिणामी, सदस्यांना मोकळीक मिळाली. त्याचा फायदा उठवीत माजी आमदार राहुल जगताप व सदस्य अण्णा शेलार यांनी भाजपचा एक सदस्य फोडल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांना मानणारे हे सदस्य असल्याचे बोलले जाते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सभापतिपदावर भाजपचे नानासाहेब ससाणे व "राष्ट्रवादी'च्या गीतांजली पाडळे हे दोन दावेदार आहेत. दोन्ही गट सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच, काही जण उपसभापतिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे रंगत अजूनच वाढली आहे. 
दरम्यान, कॉंग्रेस आघाडीचीही गटनोंदणी झालेली नसल्याने, त्यांनी एक सदस्य फोडला असला, तरी त्यांचेही सदस्य संपर्कात असल्याचे भाजप नेते सांगत आहेत.

कॉंग्रेस आघाडी प्रबळ

अनेक सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत "गुप्त मतदान घेता येईल का,' याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे या निवडीत मोठा घोडेबाजार होण्याचीही शक्‍यता आहे. सध्या कॉंग्रेस आघाडी प्रबळ वाटत असली, तरी ऐन वेळी काहीही होऊ शकते, असाही जाणकारांचा अंदाज आहे.

विखे गटावर मदार

पंचायत समिती सदस्यांपैकी अण्णा शेलार, रजनी देशमुख, जिजाबापू शिंदे हे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व मानतात. हे तिन्ही सदस्य सध्या कॉंग्रेस आघाडीसोबत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विखे पाटील गटावरच पदाधिकारी निवडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT