Teacher-Recruitment Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात पुन्हा 177 अतिथी शिक्षकांची भरती

बेळगाव जिल्हामध्ये अतिथी शिक्षकांच्या पुन्हा १७७ जागा भरती करण्यास शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव जिल्हामध्ये अतिथी शिक्षकांच्या पुन्हा १७७ जागा भरती करण्यास शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे.

बेळगाव - बेळगाव जिल्हामध्ये (Belgaum District) अतिथी शिक्षकांच्या (Teachers) पुन्हा १७७ जागा भरती (Recruitment) करण्यास शिक्षण खात्याने परवानगी (Permission) दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून १७७ अतिथी शिक्षकांची विविध तालुक्यातील शाळांमध्ये भरती केली जाणार आहे.

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने १ ते १० वीच्या शाळा पूर्व पदावर आल्यानंतर अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्पात बेळगाव शैक्षणिक जिल्हात ८०० अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र राज्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यानंतरही अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण खात्याने पुन्हा राज्यात ४००० अतिथी शिक्षकांची भरती करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. त्याला प्रतिसाद देत ४००० जागा भरती करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अतिथी शिक्षकांच्या जागा भरती होणार आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील रामदुर्ग, सौदत्ती व खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवेळी या तिन्ही तालुक्यातील शिक्षकांना बदली प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पुन्हा १७७ अतिथी शिक्षकांची नेमनुक करताना खानापूर, सौदत्ती व रामदुर्ग तालुक्यातील शाळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बदली प्रकियेनंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर ही अतिथी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हात शिक्षकांच्या 3500 हुन अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागांवरही कायमस्वरूपी शिक्षण भरती करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.

दरवर्षी अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येते. मात्र अतिथी शिक्षकांना वेळेत पगार दिला जात नाही. या वेळीही दोन महिने झाले तरी अद्याप अतिथी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Mahayuti Politics: महायुतीचा मास्टरस्ट्रोक! बंडखोरांना मोठी ऑफर; भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं कोणतं आमिष दाखवलं?

SCROLL FOR NEXT