Koyna Dam Patan Satara esakal
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या पाणीवापरात कपात; वीजनिर्मितीचं पाणीही थांबवण्याचा 'जलसंपदा'चा निर्णय

कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोयना धरणातून रब्बी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ व १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे.

सातारा : यावर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणात कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात करण्यात आली आहे. यामध्ये रब्बी व उन्हाळी हंगामातील नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी प्रस्तावित केली होती.

त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी व वीज निर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित केली आहे. त्यामुळे सिंचन व वीजनिर्मितीसाठी ७० टीएमसी इतकाच पाणीवापर केला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने (Water Resources Department) दिली आहे. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, या वर्षी पावसाळी हंगामापूर्वी एक जून धरणात एकूण १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता.

मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलिमीटर घट, तर पाणी आवकेत ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली आहे. एक जून ते १४ ऑक्टोबरदरम्यान सिंचन व वीजनिर्मितीसाठी ५.४६ व २३.०३ टीएमसी पाणीवापर झाला आहे. या या वर्षी खरीप हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणामधून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी प्रस्तावित केली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी व वीजनिर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचन व वीजनिर्मितीसाठी ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याची सूचना केली आहे.

सातारा, सांगलीचे नियोजन...

कोयना धरणातून रब्बी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ व १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापि या कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी तीन टीएमसी व सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करणे नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT