The report of the eight persons in Karjat was negative 
पश्चिम महाराष्ट्र

लका ते निगेटीव्ह निघाले बरं का... कर्जतकरांचं टेन्शन गेलं

नीलेश दिवटे

कर्जत : नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेलेल्या आठ जणांची प्रकृती ठणठणीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना काल (बुधवारी) रात्री उशिरा परत पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. यामुळे कर्जतकरांचा जीव भांड्यात पडला. अफवांना लगाम लागला आहे. कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिला आहे. 

कोरोना सर्व जगातच कहर सुरू आहे. या रोगाला घाबरून देशातील, परदेशातील लोकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. एवढंच नव्हे तर पुणे आणि मुंबईत कामा-धंद्यासाठी गेलेलेही परतले आहेत. त्यामुळे लोकांअभावी ओस पडलेली गावं पुन्हा गजबजली आहेत. तब्बल दहा हजारजण बाहेरून आल्याने गावातील लोकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेने लोकांमध्ये घबराट परसते.


तालुक्‍यात 16 जण परदेशांतून आले असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. बाहेरगावांहून शहरात नव्याने आठ जण आले होते. कोरोना संसर्गाच्या संशयावरून आरोग्य विभागाने त्यांना पकडून लगेच नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले.

ही बातमी शहरात क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली आणि अफवांचे पेव फुटले. मात्र, आज त्यांच्या तपासणीत कोरोनाची कुठलीच प्राथमिक लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, त्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. हे सर्व जण माघारी पाठविले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT