Rescued the children and handed them over to their parents in kolhapur district koihapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

या ‘ऑपरेशन मुस्कान ७’ मुळे झाली १०१ बालकांची सुटका...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बस, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणी हरविलेली मुले, भिक्षा मागणारी मुले, काम करणारी मुले अशा १०१ बालकांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिस ठाण्यात अपहरण गुन्ह्यातील १३ मुलींचा शोध लावण्यात ऑपरेशन मुस्कान ७ ला यश आले. 
हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी १ ते ३१ डिसेंबर महिनाभर राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान -७’ ही शोधमोहीम पोलिस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. यात पोलिस अधिकारी, बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती, बालकांसाठी काम करणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्था सहभागी झाल्या होत्या. ही मोहीम अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. 

६२ मुले व ३९ मुलींची सुटका

जिल्ह्यातील ३१ पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील दप्तरी नोंद असणाऱ्या अपहरणाच्या गुन्ह्यातील १३ मुलींचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व पोलिस ठाण्यातील पथकांनी घेतला. त्यानंतर संबंधित मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. गर्दीच्या ठिकाणी हरवलेली मुले, भिक्षा मागणारी मुले अशा ६२ मुले व ३९ मुली अशा १०१ बालकांची चौकशी करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याबाबत पालकांचे समुपदेशन करून मुले त्यांच्या ताब्यात दिली. इतकेच नव्हे तर न्यू शाहूपुरीत छापा टाकून अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली. या मोहिमेत सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, पोलिस कर्मचारी रवींद्र गायकवाड, आनंदा गोडसे, यशवंत उपराटे, आनंदा पाटील, महिला कर्मचारी जयश्री पाटील, शीतल लाड, माधवी घोडके, अश्‍विनी पाटील सहभागी झाले होते.

अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलींच्या शोधाकडे विशेष लक्ष ऑपरेशन मुस्कानमध्ये देण्यात आले. यात्रेसारख्या गर्दीच्या ठिकाणी हरविलेल्या लहान मुलांचे पत्ते शोधून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 
- तिरुपती काकडे (अपर पोलिस अधीक्षक)

मोहिमेबाबत...

  •   १ ते ३१ डिसेंबर महिनाभर मोहीम
  •   जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यात पथकाची नेमणूक
  •   १३ मुलींना पालकांच्या स्वाधीन केले
  •   गर्दीच्या ठिकाणी हरवलेली मुले, भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT