Revenue Minister Thorat says, we have somewhere to go wrong  
पश्चिम महाराष्ट्र

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांची  आत्महत्या.. महसूल मंत्री म्हणातात, आमचं कुठतरी चुकतंय... 

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : ""पाथर्डी तालुक्‍यातील भारजवाडी येथील मल्हारी बटुळे (वय 31) या शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या करणे अत्यंत वेदनादायी आहे,'' अशी खंत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते. 


अत्यंत सुलभ पद्धतीने कर्जमाफी केल्यानंतरही असे प्रकार घडत असतील, तर आमचे नेमके कुठे चुकते याचा विचार करणार आहोत, असे सांगून थोरात म्हणाले, ""शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम लोकशाही आघाडी सरकार निश्‍चित करीत आहे. दोन लाखांपर्यंत व त्यापुढील रकमेसाठी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा देणार आहोत.

जाचक अटी काढल्या

मागील सरकारच्या काळात दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी कुटुंबासह रात्रंदिवस लागणाऱ्या रांगा, किचकट अटी व फॉर्म, तसेच मागील बाकी रक्कम भरण्याची अट असे निकष होते. मात्र, आमच्या सरकारने ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. या कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्याने सुरवात होणार आहे. शेतकऱ्यांनी मनोधैर्य न गमावता आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून भक्कमपणे उभे राहावे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.'' 

मुस्लिमांना आरक्षण देणार 
आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी नंतरच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार ओबीसी व मराठा आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, मुस्लिमांना कोर्टात टिकेल असे आरक्षण देणार आहे. धर्म म्हणून नाही, तर आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिमांना मदत करणे लोकशाहीची गरज आहे. आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT