Roads damaged due to rain in Sangali; only patchwork is done 
पश्चिम महाराष्ट्र

अवकाळीने शहरातील रस्त्यांची चाळण; कोट्यवधीचे नुकसान; पॅचवर्कची मलमपट्टी

बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रात झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गुंठेवारी भाग तसेच नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी घुसून दैना उडाली आहे. वर्षभरापूर्वी आमदार निधी, महापालिकेचा निधी यातून सुमारे कोट्यवधी रुपये खर्चून सांगली, मिरजेतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. 

अवकाळी पावसाने चार-पाच दिवस थैमान घातले. शंभर फुटीच्या पलीकडील गुंठेवारी परिसर आणि उपनगरांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. वर्षभरापूर्वी केलेले रस्ते उखडले गेले. शंभर फुटी रस्ता, झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल चौक ते राम मंदिर रस्ता, आमराई चौक, शास्त्री चौक, जुना बुधगाव रोड यासह महापालिकेसमोरचा मुख्य रस्ता तसेच मिरजेतील रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. या अवकाळी पावसाने रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. आता तात्पुरती सोय म्हणून या उखडलेल्या रस्त्यांवर पॅचवर्कची मलमपट्टी करण्यात येते. 

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरोत्थानच्या निधीतून शहरातील अनेक प्रमुख रस्ते करण्यात आले. या योजनेतून आलेल्या 100 कोटींमध्ये सुमारे 70-75 कोटी रुपये रस्त्यांसाठीच खर्च केले. सांगली, मिरजेत युद्धपातळीवर ही कामे करण्यात आली. मात्र, अवकाळी पावसाने या रस्त्यांची दुर्दशा करून महापालिकेचा भोंगळ कारभार यानिमित्त उघडा पाडला. 

घरांमध्ये पाणी घुसून नुकसान 
जुना कुपवाड रोडवरील महात्मा गांधी कॉलनी, नेहरूनगर, त्याचबरोबर विजयनगरमधील मंगलमूर्ती कॉलनी, आनंदनगर, तुळजाईनगर, ज्ञानेश्वर कॉलनी आदी भागांतील जवळपास 100 हून अधिक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. याचबरोबर संग्रामनगर परिसरात आणि उपनगरांमध्ये पावसाचे पाणी तुंबले. स्थानिक नगरसेवक अभिजित भोसले, तसेच विष्णू माने, राजेंद्र कुंभार यांनी तातडीने महापालिका अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून परिस्थिती दाखवून दिली. 

तात्पुरत्या उपायांची मलमपट्टी 
आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी विविध उपनगरांना भेटी देऊन पाहणी केली. प्रशासनाने तातडीने आवश्‍यकतेनुसार मुरूम, चरी मारणे, क्रॉसपाईप आणि पंपाद्वारे पाणी उपसा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच, खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकून पॅचवर्कची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

नोटिशीच्या दणक्‍याने रस्त्याची दुरुस्ती 
नगरसेवक अभिजित भोसले यांनी 100 फुटी रस्त्याची दुर्दशा झाल्याबद्दल देखभाल दुरुस्ती अंतर्गत ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी नोटीस प्रशासनाला बजावली. त्यावर तातडीने कार्यवाही करीत 100 फुटी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने सुरू केले. या रस्त्यावर पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT