The robbers also stole jewelry and a car parked in front of the house belgum news 
पश्चिम महाराष्ट्र

चोरट्यांनी घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह पार्क केलेली कारही पळवली...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बंद घर फोडून चोरट्यांनी चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह घरासमोर पार्क केलेली सुमारे सात लाख रुपये किमतीची कारही लांबविली. एकूण ८.५० लाख रुपये किमतीच्या ऐवजावर त्यांनी डल्ला मारला. नक्षत्र कॉलनीत काल (ता. २६) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आशिष डी. अल्मेडा यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

चोरट्यांनी अशी साधली संधी

 याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी - श्री. अलमेडा आर्मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे निवृत्त अधिकारी असून त्यांचे नक्षत्र कॉलनी येथे घर आहे. मात्र, प्रकृती ठिक नसल्याने ते उडुपीत उपचार घेत आहेत. त्यासाठी दोन महिन्यांपासून ते नक्षत्र कॉलनीतील घराला कुलूप लावून उडुपीला राहायला गेले आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश करत केला. कपाटात ठेवलेले सुमारे एक लाख ६० हजार रुपये किंमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने चोरले. त्यावेळी चोरट्यांच्या हाती कारची चावीदेखील लागली. त्यामुळे, चोरट्यांनी घरासमोर उभी केलेली सुमारे सात लाख रुपये किमतीची बॅलेनो कारही चोरुन नेली.

रविवारी सकाळी अल्मेडा यांचा मुलगा घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने ही माहिती कॅम्प पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. चोरीची घटना रविवारी उघडकीस आली असली तरी ती नेमकी कधी घडली आहे. हे मात्र समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT