robbery at  house of the branch engineer of water resourses dept; Five lakh was stolen
robbery at house of the branch engineer of water resourses dept; Five lakh was stolen 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत 'जलसंपदा'च्या शाखा अभियंत्याचे घर फोडले; पाच लाखांचा मुद्देमाल पळविला

शैलेश पेटकर

सांगली ः जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख रुपये, असा एकूण 5 लाख 28 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची घटना गुरुवारी (ता. 26) सकाळी दहा ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजय जगन्नाथ पाटील (रा. प्रगती कॉलनी शंभर फुटी रोड) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून, भरवस्तीत घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संजय पाटील हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड इथले आहेत. सध्या ते सांगलीतील जलसंपदा विभागात शाखा अभियंता म्हणून नोकरी करतात. शंभर फुटी रोडवरील प्रगती कॉलनी येथील एका अपार्टमेंटमध्ये ते कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.

त्यांची मुलगी बेळगाव येथे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या मुलीस केएलई कॉलेज येथे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घड फोडले. घराला असणाऱ्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर दरवाजाचे कुलूप आणि कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला.

बेडरूममधील कपाटात पाटील यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी यातील 2 लाख रुपये व सोन्याचे दागिने यात मंगळसूत्र, हार, चेन, अंगठी, कर्णफुले, चांदीचे निरंजन, करंडा, गणपतीची मूर्ती, तांब्या इत्यादी दागिने चोरून पोबारा केला.

संजय पाटील रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेव्हा बेळगावहून परत आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी तातडीने पथके रवाना केली. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT