Robbery Incidence On Road In Shastri Chowk Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

लिफ्टच्या बहाण्याने तोंडाला लावायला रूमाल दिला अन्...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा एका महिलेस लिफ्टच्या बहाण्याने महिलेची बोरमाळ आणि कर्णफुले असे दागिने पळविले. सकाळी दहाच्या सुमारास शास्त्री चौकात ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. इंदुबाई शामराव पाटील (वय 65, रा. मर्दवाडी, आष्टा, वाळवा) यांनी फिर्याद दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की इंदुबाई पाटील यांचे हरिपूर (ता. मिरज) माहेर आहे. त्या माहेरी सणासुदीला येतात. शुक्रवारी (ता. 20) त्यांचा भाचा महेश बापु तोडकर (रा. हरिपूर) यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. यासाठी त्यात सकाळी नऊच्या एसटीने आष्टा येथून निघाल्या. सकाळी दहाच्या सुमारास त्या सांगली बसस्थानक येथे पोहोचल्या. तेथून हरिपूर येथे जाण्यासाठी स्टॅंटमधून त्या बाहेर पडल्या. शास्त्री चौकात चालत जात असताना दोघे अज्ञात त्यांच्याजवळ आले. कुठे चाललाय, अशी विचारणा केली. त्यावेळी पाटील यांनी हरिपूर येथे चालल्याची सांगितले. स्टॉपवर सोडतो, असे त्या दोघांनी सांगून तोंडाला लावायला एक रूमाल दिला. त्यावेळीच त्याचे डोळे चुरचुरायला लागले. त्यातच दोघांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची बोरमाळ व चार ग्रॅमचे कर्णफुले काढून घेतले. त्यानंतर त्या दोघांनी पळ काढला. 

शहर पोलिस ठाण्यात फिर्याद

दरम्यान, पाटील यांनी त्यांचा भाचा तोडकर यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सारी हकीकत सांगितली. चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्याचे काम सुरू होते. 

पिवळा धातू... 

संशयित दोघांनी महिलेला तोंडाला लावण्यासाठी रूमाल दिला. त्यावेळी त्यांचे डोळे चुरचुरायला लागले. त्यावेळी त्यांनी एक पिवळ्या रंगाचा धातू असलेले बिस्कीट त्यांच्या हाती दिली. तेवढ्यात हातचालाखी करत दागिने लंपास करण्यात आले. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT