robbery in sangli dhalgaon 90 gram gold theft from home in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : ढालगावातून चोरट्यांनी ९ तोळे दागिने केले लंपास

सकाळ वृत्तसेवा

ढालगाव (सांगली) : येथील शंकर महादेव देसाई यांच्या घरात काल मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून ९ तोळे सोने, दोन पैंजण जोड व ४७ हजार रुपये रोख लंपास केले. तर एका मजुराच्या झोपडीतील चार मोबाईल व रोख पाच हजारही चोरून नेले. पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शंकर देसाई यांचे घर पोलिस चौकीमागील बाजूस काही अंतरावर आहे. देसाई यांच्या घराला तीन दरवाजे आहेत. एका घरात त्यांचा मुलगा झोपला होता. तर स्वतः देसाई त्यांची पत्नी व माहेरी आलेली मुलगी बाहेरच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. एका दरवाजाला बाहेरून कडी घातली होती. तर एका दरवाजाला आतून कडी लावून झोपले होते. 

दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी बाहेरून लावलेली कडी काढून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले दोन गंठण, कानातील टॉप्स व दोन पैंजण जोड असे नऊ तोळे सोने व कपाटात ठेवलेले ४७ हजार रुपये रोख लंपास केले. बाजाभावाप्रमाणे सोन्याची किंमत चार लाखांच्या जवळपास होते. असे मिळून त्यांच्या घरातून सुमारे चोरट्यांनी चार लाखांवर डल्ला मारला आहे. 

देसाई यांची मुलगी शोभा ही पाहुण्यांच्या लग्नकार्यासाठी आली होती. तीचे पाच तोळे सोने व देसाई यांच्या पत्नीच्या दोन तोळे सोन्याचा यात समावेश आहे. चोरी झाल्याची घटना सकाळी उठल्यावर लक्षात आली. त्यानंतर पोलिसात कळवण्यात आले. घटनेच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांकडून फिंगरप्रिंट घेण्यात आल्या व डॉगस्कॉड आणुन तपासणी करण्यात आली. 

दरम्यान, ढालगाव महावितरणसमोर एका घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी झोपडी मारून पाच कामगार राहण्यास आहेत. त्याठिकाणी चोरट्यांनी झोपडीत घुसून पाच मोबाईल व पाच हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना ही रात्री घडली आहे. पोलिस अमिरशा फकीर, सुहास चव्हाण, सुहास मोहिते, दीपक गायकवाड, गजानन बिराजदार, अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. रात्री साडेसातच्या सुमारास विभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

माेठी बातमी! 'सोलापुरातील रोज चार व्यक्तींना पोटाच्या कर्करोगाचे निदान'; सकस आहार अन् स्वच्छतेचा अभाव, जंकफूडचे वाढते प्रमाण घातक

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

SCROLL FOR NEXT