सांगली ः स्टेशन चौकातील गणेश मार्केटमधील दुकानदारांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अरबाज अस्लम खान (वय 21), अक्षय संतोष निकम (21), करण प्रकाश गोसावी (23, सर्व रा. प्रकाशनगर गल्ली क्रमांक पाच, अहिल्यानगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित तिघेही येथील गणेश मार्केटमध्ये मंगळवारी (ता. 16) आले. नरेश भरतकुमार धनवाणी यांच्या होजिअरी दुकानातून संशयिताने चाकूचा धाक दाखवत 800 रुपयांचा शर्ट लांबविला.
सायंकाळी सातच्या सुमारास ही चोरी झाली. त्यानंतर आनंद लक्ष्मणदास धनवाणी यांच्या कविता नावाच्या दुकानात संशयित गेले. त्याठिकाणीही 550 रुपयांचा गॉगल लांबविला. साडेबारा ते एकच्या सुमारास ही चोरी झाली. त्याचवेळेत बलराज गोपीचंद धनवाणी यांच्या होजिअरी दुकानातून 1200 रुपयांचे जॅकेट नेण्यात आले. तेथून पुढे सलमान इस्लामअली शेख यांच्या कपड्याच्या दुकानातून 350 रुपयांची जीन्स पॅन्टही लांबवली.
दरम्यान, चोरट्यांचा धुमाकूळ झाल्यानंतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. "एलसीबी'सह शहर पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी होते. शहर पोलिसांच्या पथकाने करण गोसावी यास अटक केली.
"एलसीबी'च्या पथकाने अरबाज खान आणि अक्षय निकम यांना कुपवाडमधील चाणक्य चौकात अटक केली. संशयितांनी गुन्हा कबूल केला असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. "एलसीबी'चे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.