पश्चिम महाराष्ट्र

आपण शासकीय कर्मचारी आहात मालक नव्हे; भाजप नगराध्यक्षांचे 'त्यांना' प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः स्वच्छ सर्वेक्षणसाठी जनरल फंड वारेमाप व अयोग्य पद्धतीने खर्च केला आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक अवस्था बिकट होण्यामागे मुख्याधिकारी यांचाच नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभार कारणीभूत आहे. आर्थिक नियोजन नसल्यानेच जनरल फांडामधील सुमारे सहा कोटींची बिले थकीत आहेत, त्याचा खुलासा न करता नोटीस बजावण्याचे उपद्‌व्याप आपण करत आहात, असे खरमरीत प्रत्युत्तर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना दिले आहे. 

मुख्याधिकारी डांगे यांनी नगराध्यक्षा शिंदे यांना ठेकेदारींच्या बीलावर स्वाक्षरी करत नसल्याने आपणास अपात्र का करू नये, अशी नोटीस बजावली होती. त्याला नगराध्यक्षा शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ठराविक ठेकेदारांची बिले वेळेवर सही केली नाही म्हणून आपण काढलेली नोटीस कोणत्या कायद्याने काढली आहे. त्याचा खुलासा करा आणि कारभार गतीमान करण्यासाठी लोकप्रतिनिधी सक्षम आहेत असे या उत्तरात नगराध्यक्षा शिंदे यांनी नमूद केले आहे. सामान्य घरातील महिला नगराध्यक्ष असल्याने आपण मला विचारात न घेता बेफामपणे पालिकेचा मनमानी कारभार चालवत आहात. नगराध्यक्षांना अपमानास्पद नोटीसा देणे, महत्वाच्या कामाला डावलणे, शासकीय माहिती, योजना याची माहिती न देणे असे अनेक उपद्वाप करीत आहात. वरील नोटीस फक्त तीन ठेकेदारांची बिले वेळेवर सही केली नाही म्हणून काढली आहे.

मात्र, पालिकेच्या जनरल फांडामधील सुमारे सहा कोटींची बिले थकीत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणसाठी वारेमाप जनरल फंड अयोग्य पद्धतीने खर्च करून पालिकेची आर्थिक अवस्था बिकट होण्यामागे आपलाच नियोजनशून्य बेजबाबदार कारभार कारणीभूत आहे. अशा अनेक मनमानी गोष्टी आपण करत आहात. आपण शासनाचे कर्मचारी म्हणून काम करत नसून, मालक असल्यासारखे काम करीत आहात हेच आपल्या वर्तनावरून व कारभारावरून दिसून येत आहे, असेही नगराध्यांनी उत्तरात म्हटले आहे. 

वाचा : 'तिला" शिवाजी स्टेडियममागील झोपडपट्टीत नेणाऱ्यास 15 वर्षाची शिक्षा

हेही वाचा : कराड :...यांच्या वादात हरवतोय विकास 
 

""ठराविक ठेकेदारांच्या बीलावर स्वाक्षऱ्यांवरून नोटीस वजा पत्रानुसार मला कर्तव्यात कसूर केल्याचे सांगत आपण अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत सूचित केले आहे. वास्तविक लोकनियुक्त नगराध्यक्षांना शासकीय सेवकाने असे पत्र देणे कोणत्या कायद्यात बसते याचा खुलासा करावा. तीन वर्ष मुख्याधिकारी म्हणून काम करताना वारंवार अपमान होईल अशा पद्धतीचे वर्तन सातत्याने करीत आहात.'' 
रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT