Rohit Pawar on Sadabhau Khot esakal
पश्चिम महाराष्ट्र

राज ठाकरे भाषणात भाजपाचे बोल बोलतात; रोहित पवारांचा घणाघात

महाराष्ट्रातील जनता उत्तर प्रदेशाची नाही; रोहित पवार

सकाळ डिजिटल टीम

सांगली: धर्माच्या नावावर व्यक्तिगत लाभासाठी राजकारण करत असाल तर, महाराष्ट्राची लोक काही उत्तर प्रदेशाची लोक नाहीत त्यांना सर्व कळते. याचे उत्तर ते देतीलच असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत.

पुढे ते म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे बोलत आहेत. आज सामान्य लोकांच्या बाबतीत बोलण्याची गरज आहे. त्यावर न बोलता ते धर्मावर बोलत आहेत. पण धर्म हा वैयक्तिक विषय आहे. आणि या विषयावर राजकारण व्यक्तिगत लाभासाठी करत असाल तर महाराष्ट्राची लोक काही उत्तर प्रदेशाची लोक नाहीत त्यांना सर्व कळते याचे उत्तर ते देतीलच असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

राज ठाकरे यांची पूर्वीची भाषणे ही भाजप विरोधातील होती. पण आता त्यांची भाषणं ऐकली तर भाजपाचे म्हणणं ते बोलत असल्याचं लोकांच म्हणणं आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही भाजपाचे म्हणणे बोलत असाल तर लोकांना ते सर्व कळत आहे असेही ते म्हणाले.

भाजप पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली याविषयी बोलताना पवार म्हणाले, भाजप हे बऱ्याच यात्रा काढत असतात. त्याची कायम दुटप्पी भूमिका असते असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT