The rotation of "Mula" from today 
पश्चिम महाराष्ट्र

"मुळा'चे आवर्तन आजपासून 

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : ""मुळा धरणातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन डाव्या कालव्यातून उद्यापासून (मंगळवारी), तर उजव्या कालव्यातून तीन ते चार दिवसांत सुरू होईल. वांबोरी चारीतून आठ दिवसांत पाणी सुरू होईल. मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन शंभर-दीडशे रोहित्रांची महिनाभरात व्यवस्था केली जाईल,'' अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे होते. युवा नेते हर्ष तनपुरे, धनराज गाडे, निर्मला मालपाणी, बाबासाहेब भिटे, डॉ. राजेंद्र बानकर उपस्थित होते. 


मंत्री तनपुरे म्हणाले, ""महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक बोलविली आहे. राहुरी मतदारसंघातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची तयारी आहे. राहुरी बसस्थानकाची इमारत, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला प्राधान्य दिले आहे.

निळवंडे कालव्यांच्या कामांना गती दिली जाईल. ब्राह्मणी पाणीपुरवठा योजनेतील पाच गावांसह चेडगाव व मोकळ ओहोळ या गावांचा समावेश केला आहे. या योजनेतून माणसी 45 ऐवजी 55 लिटर पाणी देण्याच्या नवीन प्रस्तावास लवकरच प्रशासकीय मान्यता दिली जाईल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT