sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांवर वाढदिनीच आली होती 'आबांना' खांदा देण्याची वेळ

‘आर. आर. तुम्ही मला वेळीच हे सांगायला हवे होते’, हे शरद पवार यांचे शब्द वेदना देणारे होते.

सकाळ डिजिटल टीम

सांगली - १६ फेब्रुवारी... सांगली (Sangli) जिल्हा कधीच विसरू शकणार नाही, असा आजचा दिवस. जिल्ह्याचे आघाडीचे नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आज वाढदिवस... पण, २०१५ साली याच दिवशी जयंत पाटील यांना राजकारणातील आपल्या एका महान सहकाऱ्याला खांदा देण्याची वेळ आली होती. याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी अखेरचा श्‍वास घेतला होता. (R.R. patlil death anniversary)

जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांची राजकीय कारकीर्द समांतरच राहिली. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातून राजकारणाची धुरा कोण वाहणार, असा प्रश्‍न पुढे आला. त्यावेळी जयंतरावांच्या मातोश्री कुसुमताईंनी जयंत पाटील यांच्याकडे ती धुरा सोपवावी, असा निर्णय दिला आणि जयंतराव राजकारणात आले. त्याउलट आर. आर. पाटील यांचा प्रवास राहिला. अंजनीसारख्या एका छोट्या गावातील फाटक्या कुटुंबातून ते पुढे आले. संघर्षातून दिवस काढत जिल्हा परिषद लढवली, जिंकली. पुढे ध्यानीमनी नसताना ते विधानसभेच्या आखाड्यात उतरले आणि बलाढ्य आमदार दिनकर पाटील यांना पराभूत करून राजकारणात मोठी झेप घेतली.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदा त्या पक्षात जाणारे जयंत आणि आर. आर. पाटील हेच होते. नव्याने स्थापन झालेला हा पक्ष राज्यात सत्तेत येत असताना या दोन्ही नेत्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. आर. आर. पाटील पक्षाचा राज्यव्यापी चेहरा झाले आणि त्यांनी वादळ उठवले. त्याचे बक्षिस म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी छाप सोडणारे काम उभे केले. जयंत पाटील यांच्याकडे सलग नऊ वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या राहिल्या. अर्थकारणातील त्यांचा अनुभव प्रचंड आहे. ग्रामविकास आणि जलसंपदा या खात्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील इंजिनिअर नेहमीच प्रभावी छाप सोडत राहिला आहे.

सन २०१४ ला देशात आणि राज्यात भाजपचे (BJP) वारे वाहत होते. त्याचवेळी जिल्ह्याच्या राजकारणात मात्र न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आर. आर. पाटील यांना कर्करोगाचे निदान झाले. आबांनी या असाध्य आजारावर उपचार करून घ्यायला विलंब लावला, अशी हळहळ आणि खंत त्यांचे समर्थक आजही व्यक्त करतात. ‘आर. आर. तुम्ही मला वेळीच हे सांगायला हवे होते’, हे शरद पवार यांचे शब्द वेदना देणारे होते. आबांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. याच दिवशी जयंत पाटील यांचा वाढदिवस असतो. या दिवशी जिल्ह्यावर शोककळा पसरली होती.

अंजनीत आर. आर. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. धायमोकलून लोक रडत होते. आबांच्या पार्थिवाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Patil) आणि जयंत पाटील यांनी खांदा दिला होता. आज त्याला सात वर्षे झाली, मात्र ते दुःख कुणीही विसरलेले नाही. जयंत पाटील यांनी आज वाढदिवस साजरा करण्याआधी आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ‘आबा तुमचे कार्य राज्यातील जनता कधीच विसरू शकणार नाही’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT