RSS is providing Tent for the police 
पश्चिम महाराष्ट्र

Corona Virus : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पोलिसांसाठी राहुट्या 

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'च्या संचारबंदीमुळे २४ तास पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागत असल्याने ऊन, वारा, पावसात आडोसा मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शहरात विविध ठिकाणी राहुट्या उभारल्या जात आहेत. 

लॉकडाऊन असताना पिकअप, टेम्पो घेऊन जात होता कामगारांना; पोलिसांनी पकडले अन्..

नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांना काही क्षणांचीही विश्रांती घेण्यासाठी काहीच सुविधा नाही. तसेच त्यांना रस्त्यावर थांबून किंवा पोलिस ठाणे गाठून जेवण करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे, अशा वेळी पोलिसांना आडोसा शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढील काही आठवडे हा कोरोना'चा बंदोबस्त कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन पोलिस अधिकार्यांनी संघाच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. संघाने खास हिवाळ्यात होणाऱ्या 'हेमंत' शिबीरांसाठी ६० राहुट्या घेऊन ठेवलेल्या आहेत. या राहुट्या पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. 

 Coronavirus : कर्तव्यावर असतानाच पोलिस देतायेत गरजूंना जेवणाचा डबा 

सध्या सिंहगड रस्ता, पर्वती, कोथरूड परिसरात पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी सुमारे १५ राहुट्या उभारल्या आहेत. पुढे जशी मागणी येईल तशी वडगाव शेरी, हडपसर, विद्यापीठ, कसबा, येरवडा, कात्रज या भागात ही राहुट्या उभारल्या जातील, असे संघाचे शहर सहकार्यवाह सचिन भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT