Sadabhau Khot on Sharad Pawar google
पश्चिम महाराष्ट्र

'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? ब्रह्मदेवाला चुकवून...' सदाभाऊंचा खोचक टोला

'शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत?'

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत?'

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपातील संघर्ष वाढत असल्याची चिन्हे पहायला मिळत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सत्तासंघर्षाचा वाद वाढताना दिसत आहेत. दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. दरम्यान, आता पुन्हा सांगलीतून एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचंल आहे. 'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,' असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे. (Sadabhau Khot on Sharad Pawar)

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी पवारांवर टीका करताना खोत म्हणाले, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बोलताना सदाभाऊ म्हणाले, 'मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं,' अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं समर्थन केलं आहे.

राजकीय वर्तुळात नेते सदाभाऊ खोत हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. खासदार सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्यांनी अनेकवेळा डिवचंल आहे. दरम्यान, आता त्यांच्या याव वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

Supreme Court: फटाके फोडण्यावर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

बुध-राहूच्या नक्षत्र संयोगामुळे या ६ राशींचं नशीब फळफळणार; करिअर, व्यवसाय आणि धनलाभासाठी पुढील १२ दिवस ठरणार खास

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT