Sadashiv, Nimbevwa couple's fat one kg of fruit ... for the homeless! 
पश्चिम महाराष्ट्र

सदाशिव, निंबेव्वा दाम्पत्याचा वसा एक किलो फळं...बेघरांसाठी! 

शैलेश पेटकर

सांगली : सदाशिव अन्‌ निंबेव्वा. अपंगत्वावर मात करून सुखी संसार करणारं मध्यमवयीन जोडपं. दोन मुलं. फळ विक्रीतून घर उभारलं, सावरलं... आणि आता थोडा विकास करायचा असं स्वप्न पाहणारं चौकोनी कुटुंब... पण, या कुटुंबात एक वेगळेपणाही आहे. 

सदाशिव यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या उत्पन्नातील एका छोटा भाग बेघरांसाठी खर्च करण्याचा विडा उचललाय. येथील सावली बेघर केंद्रात ते सातत्याने मोफत फळे देण्याचे काम करताहेत. कधी केळी तर कधी सफरचंद... जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो, यावर त्यांचा अगाध विश्‍वास आहे. दिव्यांग असूनही आपण परिस्थितीवर मात केली, याचा त्यांना सार्थ अभिमान आहेच, शिवाय परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्यांना साथ देण्याची भावनाही. 
सदाशिव गौडाप्पा दुधाळ हे मूळचे कर्नाटकातील. पण, दोन दशकांपासून ते सांगलीकर आहेत. 

दिव्यांग असताना आपला कोणावर भार पडू नये, असे त्यांना पहिल्यापासूनच वाटायचे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या जिद्दीने व्यवसायात उडी घेतली. सुरवातीला अनेक संकट आली, मात्र त्यांना अगदी समर्थपणे त्यांनी तोंड दिले. तीन चाकी सायकलवर त्यांनी त्यांनी फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर बाजारात बसून त्यांनी विक्री करायला सुरवात केली. त्यांच्या या व्यवसायाला पत्नीनेही साथ दिली. घरचा सारा भार संभाळून त्या व्यवसायाला हातभार लावतात. दुधाळ दाम्पत्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी खटपट सुरू आहे. 

अनलॉक काळात सदाशिव यांचा सावली बेघर निवारा केंद्राशी संपर्क आला. तेथील बेघरांना साथ देण्याचेही त्यांनी मनाशी पक्के केले. आपल्याला मिळणाऱ्या पैशातून काही वाटा बेघरांसाठीही त्यांनी देण्यास सुरवात केली. कोठेही गवगवा न करता, त्यांच्या या कार्यात सातत्य ठेवले आहे. 

सदाशिव दुधाळ यांनी सावली केंद्रांत मोफत फळे आणून दिली. दिव्यांग असतानाही त्यांनी परिस्थितीवर मात केली आहे. तसेच परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्यांना साथही त्यांनी दिली आहे. 
- मुस्तफा मुजावर, सावली बेघर निवारा केंद्र


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

Diabetes Can Be Prevented: मधुमेह टाळता येऊ शकतो! पण तुम्हाला पाळावे लागतील 'हे' नियम

SCROLL FOR NEXT