Satara Kass 
पश्चिम महाराष्ट्र

`सकाळ'च्या पुढाकाराने कास स्वच्छता मोहिमेंतर्गत कास पठारावर कार्यशाळा

शैलेन्द्र पाटील

सातारा : ""कास पठाराचे चलन- वलन नैसर्गिकरीत्या चालू देणे हेच पठाराचे रक्षण आणि त्यातूनच संवर्धन आहे. पठाराची जैवविविधता जपली तरच पर्यटन राहील,'' असे मत मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले. 

"सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू असलेल्या कास स्वच्छता मोहिमेंतर्गत कास पठारावर आज एक कार्यशाळा झाली. त्यात ते बोलत होते. कास पठाराभोवतीच्या सहा गावांतील ग्रामस्थांच्या मदतीने कास पठार कार्यकारी समिती पठाराचे व्यवस्थापन पाहते. या समितीने नेमलेले गाईड, सुरक्षा रक्षक, स्वच्छतादूत आदी कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. हे सर्व कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ आहेत. ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव, वनपाल श्रीरंग शिंदे, श्रीरंग कदम प्रमुख उपस्थित होते. नजीकच्या काळात कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होईल. त्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांशी सौजन्यपूर्ण वर्तन, जैवविविधतेचे संरक्षण, गर्दीचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर भोईटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

येणाऱ्या पर्यटकांना वनस्पती व फुलांची माहिती देताना गाईडनी स्थानिक नावांचा वापर करावा, तसेच औषधी वनस्पतींचे उपयोग सांगावेत. पठारावर स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमण्याऐवजी अस्वच्छताच होणार नाही, याची काळजी घ्यावी. असा कचरा कुठे दिसल्यास कोणीतरी येऊन तो उचलेल याची वाट न पाहता ज्याला दिसेल त्याने तो उचलावा, अशी अपेक्षा भोईटे यांनी व्यक्त केली. प्लॅस्टिकमुक्त पठार ही संकल्पना स्पष्ट करून सुधीर सुकाळे यांनी कर्मचाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या. 

कास- बामणोलीचे वनपाल श्रीरंग कदम, श्रीरंग शिंदे, कास पठार कार्यकारी समिती सदस्य ज्ञानेश्वर आखाडे, विठ्ठल कदम, मारुती चिकणे, बजरंग कदम, विजय बादापुरे, संगीता अहिरे, तसेच कास पठारावरील सुमारे 80 कर्मचारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश्वरी मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT