पश्चिम महाराष्ट्र

ईडब्ल्यूएस देऊन काय दिवे लावले ? समरजितसिंह घाटगेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

सांगली : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटा अंतर्गत (ईडब्ल्यूएस) शैक्षणिक आणि शासनांतर्गत येणाऱ्या काही नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेऊन राज्य शासनाने काय दिवे लावले? असा सवाल भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे (samrjitsing ghatage) यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) केंद्र सरकारने सकारात्मक (central goverment) भूमिका घेतली. मात्र राज्य शासनाने या प्रश्नावर योग्य पावले उचलली नसल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ‘‘पक्ष व झेंडा बाजूला ठेवून आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्व संघटना, गट-तट, मोर्चा यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. सुमारे १५ हजार अर्ज आरक्षणाच्या विरोधात आहेत. यावर राज्याचे तीन व केंद्राचे तीन असे सहा आयोग स्थापन झाले. आयोगाने अभ्यास करून मराठा समाज (maratha community) हा मागासलेला आहे, असा अभिप्राय देऊनही त्याची सुसंगत मांडणी न्यायालयात करण्यात राज्य शासन कमी पडले. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळणारच नाही, असे वातावरण पसरत आहे. मात्र आरक्षणाच्या विषयावर असणारे मतभेद चर्चेद्वारे मिटवून संघटित होण्याबाबत मी भूमिका घेतली आहे.

तब्बल ५८ मराठा मोर्चानंतर मागील सत्ताधारी शासनाला काहीतरी निर्णय घेणे भाग पडले. तसा दबाव व ताकद निर्माण होणे गरजेचे आहे. केंद्राने सकारात्मक पावले टाकून न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. मात्र राज्य शासनाने तशी कोणताही हालचाल केली नसल्याचा त्यांनी आरोप केला. ते म्हणाले,‘‘मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २ हजार १८५ उमेदवारांच्या नियुक्‍त्या न्यायालयाच्या सूचनेनंतरही अद्याप का झालेल्या नाहीत? त्या कधी होणार? रखडलेल्या स्पर्धा परीक्षा कधी होणार? यासारखे प्रश्न अनुत्तरितच आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शासनाने दिरंगाई केली आहे. सुमारे ७० लाख शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणाने केलेली कर्जफेड ही त्यांची चूक आहे काय? वीज बिल माफीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा होतात. मात्र ठोस निर्णय घेण्यात सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस तत्काळ मागे घेण्याची मागणी घाटगे यांनी केली.

संभाजीराजेंबाबत नो कॉमेंट्स...

पत्रकार परिषदेदरम्यान संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समरजितसिंह घाटगे यांनी ‘ते आदरणीय आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत मी बोलणार नाही. नो कॉमेटस्...‘असे उत्तर दिले. दरम्यान सर्किट हाऊसमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांसमवेत श्री. घाटगे यांनी बैठक घेत, मते जाणून घेतली. बैठकीवेळी ते कार्यकर्ता म्हणून बसल्याने उपस्थितांतून आश्चर्य व्यक्त होत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT