samptrav deshmikh elected new member in sangli zp
samptrav deshmikh elected new member in sangli zp 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कोकरूड गण जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत अन्य पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार व सह्याद्री खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख हे बिनविरोध निवडून आले आहेत.

रिक्त जागेवर लागली होती निवडणूक

सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हापरिषद सदस्यत्वचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे त्या रिक्त जागेवर ही निवडणूक लागली होती.यासाठी महाडिक युवा शक्ती मधून अनिल मारुती पाटील (अपक्ष), भाजपा मधून संपतराव गुलाबराव देशमुख, काँग्रेस मधून प्रदीप नारायण धस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून देवेंद्र वसंत धस, शिवसेनेतून राजाराम सदाशिव पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते.

बिनविरोधसाठी भाजपाने केले होते आवाहन 

कै.शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे बंधू संपतराव देशमुख यांना इतर पक्षानी बिनविरोध साठी सहकार्य करावे असे आवाहन भाजपच्यावतीने माजी आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी केले होते. राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्या नुसार सर्व पक्षांच्या उमेदवारांनी नेत्यांशी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार काँग्रेस,अपक्ष, शिवसेना, स्वाभिमानाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने संपतराव देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकर्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT