Sangali civil hospital always in problems
Sangali civil hospital always in problems 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली "सिव्हिल'ची उपेक्षा नव्या दशकात तरी संपेल? 

शैलेश पेटकर, जयसिंग कुंभार

सांगली जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर व कर्नाटक सीमावर्ती तालुक्‍यांतील लोकांसाठी पद्मभूषण वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाचा मोठा आधार आहे. शहराच्या मध्यवर्ती जागेत सुमार 30 एकर क्षेत्राची प्रशस्त जागा असलेले हे रुग्णालय आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र या रुग्णालयाची नेहमीच परवड होत आहे. रुग्णालयाची उपेक्षा संपवण्यासाठी काय करता येईल याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. 

"सिव्हिल' हे केवळ गरीबच नव्हे, तर सर्वस्तरांतील रुग्णांसाठी आधार आहे. आजही या रुग्णालयात दिवसाकाठी सरासरी 20 ते 25 मोठ्या आणि छोट्या स्वरुपाच्या 40 ते 50 शस्त्रक्रिया होत असतात. बाह्य रुग्ण विभागात 100 ते 1500 तर आंतरुग्ण विभागात सरासरी पाचशेंवर रुग्ण उपचार घेत असतात. वर्षाकाठी सुमारे साडेतीन लाखांवर रुग्ण उपचार घेतात. यातून या रुग्णालयाची गरज आणि व्याप्ती लक्षात येते. मात्र हे

रुग्णालय सुसज्ज आणि सर्वसोयींनी युक्त करतानाच आधुनिक उपचाराच्या सुविधांची गरज आहे. विशेषतः सुपरस्पेशालिटी गटातील मेंदू, हृदय, बालरुग्ण, प्लास्टीक सर्जरी, मानसिक विकार आदी वैद्यकीय शाखांच्या विस्ताराबाबत सातत्याने मागणी आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे तीनशेंवर डॉक्‍टर्स या रुग्णालयांशी संलग्न असतात. त्यातून इथल्या मनुष्यबळाचा व्याप लक्षात यावा. या साऱ्या जमेच्या बाजूंचा विचार करता पन्नास वर्षांपूर्वी लोकसंख्येचा विचार करून उभारलेल्या या रुग्णालयासाठी काय व्हायला हवे याचा हा लेखाजोखा. 

विस्ताराची योजना 
शंभर खाटांची प्रसूतिगृहाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे 60 ः 40 टक्के अनुदान मंजूर आहे. सध्याच्या जुन्या इमारतीमधील शंभर खाटांची इमारत धोकेदायक ठरल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यालगत पाचशे खाटांची स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे. या दोन्ही योजना मार्गी लागल्यानंतर रुग्णालयातील खाटांची संख्या हजारांवर जाईल. याबाबत स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीची तसेच जनआंदोलनाची गरज आहे. 

मागण्या आणि अपेक्षा 

  • 390 परिचारक स्टाफला मंजुरी, पण सध्या शंभर जागा रिक्त. 
  • अतिदक्षता विभागाच्या 24 खाटा, मात्र गरज सुमारे पन्नास खाटांची. 
  • रुग्ण नातेवाईकांसाठी निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रशस्त हॉलची गरज. 
  • "एमआरआय' सुविधा नसल्याने मिरज रुग्णालय किंवा खासगीत जावे लागते. 
  • इन कॅमेरा उत्तरीय तपासणीची सोय नसल्याने नातलगांची गैरसोय. 
  • निवासी डॉक्‍टरांसाठी सुसज्ज आणि विस्तारित वसतिगृहाची गरज. 
  • रुग्णालय खोक्‍यांनी वेढले असून ती हटवण्याची गरज. 
  • रुग्णालय व परिसराभोवतीची संरक्षक भिंतीची डागडुजी. 

देणग्यांमधून विकास निधी उभा राहू शकतो

सिव्हिलसाठी शहरातील सजग नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करून या रुग्णालयाच्या दैनंदिन कारभाराला गतिमान करता येणे शक्‍य आहे. सध्या ही समिती केवळ कागदावरच आहे. रुग्णालयासाठी स्थानिक स्तरावर देणग्यांमधून विकास निधी उभा राहू शकतो त्यातून रुग्णालय परिसराचा विकास शक्‍य आहे. खासदार-आमदारांनी त्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 

सुविधांची गरज आहे
रुग्णालयाच्या अंतर्गत स्वच्छतेत गेल्या काही वर्षांत चांगली सुधारणा झाली आहे. मात्र परिसरात बांधकामामुळे अस्वच्छता आहे. त्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृहांपासून अन्य निवास व सुविधांची गरज आहे. याबाबतचे प्रस्तावही शासनाकडे सादर आहेत. 
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल रुग्णालय 

सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
सिव्हिलच्या उर्वरित जागेचा वापर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी व्हायला हवा. एखाद्या संस्थेने जबाबदारी घेतली तर आम्ही त्यांच्यासाठी उद्यानातील रोपे तसेच नियोजनाची जबाबदारी घेऊ. या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. 
- डॉ. विशाल चौगुले, आयुर्वेद पंचकर्म प्रॅक्‍टीशनर्स असोसिएशन  

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT