Sangali district has produced 82 lakh quintals of sugar this year 
पश्चिम महाराष्ट्र

या जिल्ह्यात यंदा 82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा 12 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अखेर संपला आहे. या कारखान्यांनी यंदा 66 लाख 79 हजार 385 टन उसाचे गाळप केले. तर त्यापासून 82 लाख 46 हजार 849 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी उतारा 12.35 टक्के इतका मिळाला. संपलेल्या हंगामात दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे गतवर्षीपेक्षा 18 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घटले.

गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. महापुराच्या काळात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्‍यांसह परिसरातील ऊस बराच काळ पाण्याखाली होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. महापुरातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा अतिवृष्टीमुळे देखील शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

जवळपास 25 टक्के ऊस क्षेत्र घटले. तशातच अतिवृष्टीमुळे गळीत हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यामुळे कारखान्यांना गाळपासाठी स्पर्धा करावी लागणार असे चित्र होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात "कोरोना' मुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कारखानदारीला फटका बसला. बरेच ऊसतोड मजूर गावाकडे परतले. त्यामुळे काही कारखान्यांना गळीत हंगाम उरकण्यासाठी कसरत करावी लागली. ऊसतोड लवकर होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी फड पेटले गेले. 

अनेक अडचणीचा सामना साखर कारखानदारीला करावा लागला. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे 12 कारखाने सुरू राहिले. इतर कारखाने अडचणींमुळे सुरूच झाले नाहीत. मार्चअखेर पासून कारखान्यांनी हंगाम बंद करण्यास सुरवात केली. तर एप्रिलच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात हंगामाची सांगता झाली. काही कारखान्यांनी चार महिने तर काहींनी साडे चार महिने हंगाम चालवला. बारा कारखान्यांनी 66 लाख 79 हजार 385 टन उसाचे गाळप केले. तर त्यापासून 82 लाख 46 हजार 849 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. 
 

जिल्ह्यातील साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

  • वसंतदादा-दत्त इंडिया.......853590
  • राजारामबापू साखराळे..... 1152800
  • विश्‍वास सहकारी...............615630
  • हुतात्मा किसन अहिर.........718625
  • राजारामबापू वाटेगाव..........625900
  • सोनहिरा सहकारी.............1060600
  • क्रांती-कुंडल......................995700
  • सर्वोदय-राजारामबापू...........455550
  • मोहनराव शिंदे...................250500
  • निनाईदेवी-दालमिया..........395300
  • उदगिरी शुगर...................617500
  • सद्‌गुरू श्री-श्री...................505154
  • एकूण............................8246849

राजारामबापू' चे सर्वाधिक गाळप
राजारामबापू कारखाना साखराळेने सर्वाधिक 8 लाख 79 हजार 659 टन उसाचे गाळप करून 11 लाख 52 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. त्या खालोखाल सोनहिरा, क्रांती, दत्त इंडियाने गाळप केले. साखर उताऱ्यातही राजारामबापू साखराळेने बाजी मारली. 13.11 एवढा सर्वाधिक उतारा घेतला. त्या खालोखाल निनाईदेवी, राजारामबापू, सर्वोदय, सोनहिरा कारखान्यांनी उतारा मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

India Squad for T20 World Cup 2026: संजू-अभिषेक ओपनिंगला, रिंकू सिंग फिनिशर; वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी Playing XI, थरथर कापतील प्रतिस्पर्धी...

झी मराठीची मोठी घोषणा! पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका; वाचा तारीख आणि वेळ

नवीन वर्षात स्लिम व्हायचं स्वप्न? वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या 10 गोल्डन टिप्स

Nashik Municipal Election : भाजपचा 'मिशन १०० प्लस'चा प्लॅन; नाशिकमध्ये उमेदवारीसाठी आता त्रिस्तरीय सर्वेक्षण सुरू!

SCROLL FOR NEXT