Sangali Lezim Video Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Lezim Video : जल्लोषाची लेझीम! सांगलीतील विसावा मंडळाचा लेझीम सराव एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : गणेशोत्सव जवळ आला असून देशभरातील गणेशभक्तामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वांनाच गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ढोल ताशा पथक, लेझीम पथक, देखावे यांचे रंगीत तालीम आणि सराव सुरू झाले आहेत. तर सांगलीच्या प्रसिद्ध असलेल्या विसावा तरूण मंडळाकडून लेझीमचा सराव सुरू करण्यात आला आहे.

कोरोना काळातल्या दोन वर्षांत गणेशोत्सवामध्ये लोकांना गर्दी करता आली नव्हती. तर मागच्या वर्षी लॉकडाऊन नसल्यामुळे गणेशभक्तांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. त्यानंतर आता यावर्षीच्या गणेशोत्सवासाठीही भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सांगलीतील लेझीमचा खेळ पाहिला तर तुम्हीही अचंबित व्हाल.

दरम्यान, विसावा मंडळाकडून लेझीम सरावाचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले असून हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगात उत्साह संचारेल. लहान मुले, मुली, तरूण मुले आणि वयस्कर मंडळीसुद्धा लेझीमच्या सरावामध्ये सामील झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असून नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT