wild Animal sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सांगलीवाडीत महाकाय गव्याचे दर्शन

सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगलीवाडीतील (Sangaliwadi) बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. कदमवाडीच्या दिशेने आलेला गवा कदमवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडून नदीकाठी असलेल्या ऊसाच्या शेतात गेल्याची माहिती प्राणीमित्र विजय निकम यांच्याकडून मिळाली.

कोल्हापूर परिसरात शाहूवाडी भागात दोन गव्यांचा वावर, गव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू , अशा काही घटना ताजा असतानाच सांगली परिसरात गव्याचे आगमन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कसबे डिग्रजच्या शेतामळ्यात गवा आला होता. त्याच्या आगोदर सांगलीत विश्रामबागमध्ये रात्रीच्यावेळी गवा आला होता. गव्हर्मेंट कॉलनीतील रस्त्यावर अचानक महाकाय गवा दिसताच अनेकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर शनिवारी रात्री सांगलीवाडी परिसरात गवा दिसला आहे.

सांगलीवाडीतून कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास गवा दिसला. बायपास रस्त्यालगत आपल्या घरासमोरुनच नवीन पुलाशेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात गवा गेल्याचा दावा निकम यांनी केला आहे. गवा आल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल त्या परिसरात दाखल झाले होते. गवा आल्याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT