...अन् बाळ विसावले तिच्या कुशीत !
...अन् बाळ विसावले तिच्या कुशीत ! sakal
पश्चिम महाराष्ट्र

...अन् बाळ विसावले तिच्या कुशीत !

सकाळ वृत्तसेवा

सांगली : ती पंधरा वर्षांची होती. कुणीतरी तिच्यावर अत्याचार केला. ती भेदरली, गप्प राहिली. काही दिवसांनी कळले ती गर्भवती आहे. पर्याय नव्हता. तिला बाळाला जन्म द्यावा लागला. बाळ एका संस्थेत दिले गेले. ती घरी परतली. एका अपघाताने तिच्या आयुष्यात संकटांची मालिकाच सुरू झाली. ती आजही संपलेली नाही....

तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यातून जन्माला आलेले बाळ दूर ठेवून ती नव्या आयुष्यात पुढे निघाली, मात्र ती काळीकुट्ट सावली तिची पाठ सोडायला तयार नाही. काही महिन्यांनी तिचे लग्न लावून दिले गेले. तिच्या नवऱ्याला तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली गेली नाही. लग्नानंतर काही काळाने त्याला ती समजली. त्याने तिला सोडून दिले. हा आघातही तिने पचवला. खरे तर तिचे वयच नव्हते, असे आघात होण्याचे. जी वाट मिळेल त्यावरून काटे तुडवत ती निघाली. रक्तबंबाळ होत चालत राहिली. त्यातच तिला आयुष्यभर साथ देण्याचा शब्द मिळाला, तिची सारी परिस्थिती जाणून घेऊनही एकजण तिच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी लग्न केले. मात्र मंदिरात, त्याची कुठे नोंदच नाही. पुन्हा संकट. पुढे काही कारणाने तिच्या नवऱ्याला अटक झाली. दीर्घकाळासाठी तो कारागृहात बंद झाला. दरम्यानच्या काळात ती पुन्हा गर्भवती झाली...

काही दिवसांपूर्वी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. विट्यात एसटी स्थानकाजवळ तिने बाळाला जन्म दिला. शासकीय रुग्णवाहिकेतून येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात तिला दाखल केले गेले. तिचा इतिहास जाणून घेतल्यानंतर यंत्रणा हादरली. एक तर तिच्या गर्भवती असण्याची कुठेच नोंद नव्हती. त्यात आधी ती कुमारी माता होती. पहिल्या बाळाचे काय झाले, याचे धड उत्तर मिळेना. आता हे जन्माला आलेले बाळ, ही मुलगी सांभाळणार कशी? तिच्याकडून त्याला काही बरे वाईट झाले तर... वेगळाच काही अनर्थ घडला तर... खूप सारे प्रश्‍न वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांना सावध करणारे होते. त्यांनी बाळ तिच्यापासून दूर ठेवले. तिला स्तनपानाचा अधिकार दिला नाही. त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला पाचारण केले. त्यांनीही ‘हे बाळ आईकडे सोपवता येणार नाही’, अशी भूमिका घेतली...

हा तिच्यावर अन्याय होतोय, याची जाणीव झाल्यानंतर भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर, दिव्या कुलकर्णी, शकुंतला काशीद, शोभा बिक्कड त्यांनी त्यात लक्ष घातले. त्यांनी या मुलीचा सगळा इतिहास खोदून काढला, पहिले बाळ कुठे आहे, त्याची माहिती मिळवली. ते सुरक्षित आहे व त्याचा सांभाळ योग्य होतोय याची खात्री केली. तिच्या कुटुंबाशीही चर्चा केली. मग दुसऱ्या बाळाबाबत यंत्रणा जुमानत नाही म्हटल्यावर कायद्यावर बोट ठेवले. त्यांनी आठवडाभर लढा दिला आणि तो जिंकला. अखेर ते बाळ तिच्या ताब्यात देण्याचे आदेश झाले. तिच्या गावी जाऊन मध्यरात्री तिच्या कुशीत ते बाळ ठेवले आणि माय-लेकांच्या या भेटीने सगळ्यांचे डोळे पाणावले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT