सांगली : विहिरीत पडलेला कोल्हा बचाव पथकाने वाचवला sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : विहिरीत पडलेला कोल्हा बचाव पथकाने वाचवला

अजित झळके - सकाळ वृत्तसेवा

कुपवाड ः बेडग (ता. मिरज) येथे एक कोल्हा विहिरीत पडला. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ निम्न स्वाक्षरीकर्ता यांच्याकडील बचाव पथक रवाना झाले आणि त्यांनी पिंजरा टाकून त्याला वाचवले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी यू. स. पाटील यांनी ही माहिती दिली.

हा कोल्हा विहिरीत पडला असल्याची माहिती सचिन कणसे यांनी दिली. बेडग ते मालगाव रस्त्यावरील खरात वस्ती, कणसे मळा येथील विहिरीत तो पडला होता. संभाजी भोसले यांच्या विहिरीत कोल्हा असल्याचे समजताच गावातील लोकही जमा झाले होते. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर टीम रवाना झाली आणि त्यांनी यशस्वीपणे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. या बचाव पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनपाल तुषार भोरे, सागर थोरवत, कौशल्या सातपुते, संजीव जोसी, पांडूरंग कांबळे, वनमदूर गावडे आदींनी सहभाग घेतला. उपवनसंरक्षक वन विभाग व सहायक वनसंरक्षक विभागाकडून मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या द्राक्ष छाटणी आणि ऊस तोडणी सुरु आहे. त्यामुळे वन्यजीव तेथे भटकू शकतात. लोकांनी त्यांना इजा न करता १९२६ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT