sangli news
sangli news  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Dahihandi: ‘अप्सरा’ची अदा, मिरजकर फिदा',भाजप-जनसुराज्य महायुती दहीहंडीचा दिमाखदार सोहळा

सकाळ वृत्तसेवा

‘अप्सरा आलीऽऽऽ’ने मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनाली कुलकर्णीने काल मिरजेत ताल धरला आणि त्यावर मिरजेकर बेभान होऊन नाचले. पावसाने बदललेले वातावरण, त्यात आकर्षक प्रकाश झोतांच्या झगमगाटात, हंडी फोडण्यासाठी रचलेले थरावर थर आणि एकच जल्लोष अशा वातावरणात भाजप-जनसुराज्य महायुतीची दहीहंडी लक्षवेधी ठरली. तासगाव येथील शिवगर्जना मंडळाने आठ थर रचत ती फोडली आणि ५ लाख ५ हजार ९९९ रुपये जिंकले.

मिरज-पंढरपूर रोडवरील कोळेकर महाराज मठाच्या मैदानावर भाजप-जनसुराज्य महायुती दहीहंडीचा दिमाखदार सोहळा पार पडला. मिरजेतील सर्वात मोठ्या रकमेची दहीहंडी म्हणून या सोहळ्याची चर्चा झडली होती. काल गर्दीनेही उच्चांक गाठला. या दहिहंडीत मुंबई, पुणे आणि तासगाव येथील गोविंदा पथकाने सहभाग घेतला.

जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे, युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे मिरज विधानसभा निवडणुक प्रमुख मोहन वनखंडे, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, भाजप पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, प्रदेश सदस्य पांडुरंग कोरे, हेमलता कदम, विश्वगंधा कदम, सागर वनखंडे प्रमुख उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सादर केलेल्या लावणीवर तरुणाई थरकली. सहकलाकार मीनाक्षी गडेकर, श्रृतिक लोंढे यांनी एकापेक्षा एक बहरदार लावण्या सादर केल्या. प्रथम पुणे, मुंबई आणि तासगाव येथील पथकांनी सलामी मनोरे चढवत सलामी दिली. यावेळी समित कदम यांनी मिरजेच्या इतिहासात महायुतीची पहिलीच भव्य दिव्य दहिहांडी होत असून मिरजकरांसह जिल्ह्यातील युवकांनी हजेरी लावल्याबद्दल आभार मानले.

मोहन वनखंडे यांनी महायुती सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम मिरज शहरात याहून मोठे करेल, अशी घोषणा केली. माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, माजी शहराध्यक्ष दिपक शिंदे-म्हैसाळकर, आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी नगरसेवक गणेश माळी, महादेव कुरणे, बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुल्लोळी उपस्थित होते. समित कदम व सागर वनखंडे युवा मंचने नियोजन केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची हजेरी लावली

भाजप-जनसुराज्य महायुतीच्या दहीहंडीस काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, नगरसेवक संजय मेंढे, करण जामदार, अय्याज नायकवडी, तानाजी पाटील, दिनकर पाटील, दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यासपीठावर पहिल्या रांगेत हजेरी लावली. मिरजेत भाजपांर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे, अशावेळी भाजपचे नेतेही झाडून या दहीहंडीला हजर होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओव्दारे शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT