Sangli Esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीच्या ऐश्वर्याचा थाटच निराळा, वाढदिवसाला सारा गाव गोळा!

इनाम धामणी गावात वाढदिवस साजरा

सकाळ डिजिटल टीम

सांगली: सौन्दर्य स्पर्धेत तब्बल चारवेळा प्रथम क्रमांक मिळवलेल्या सांगलीतील (Sangli) ऐश्वर्याचा थाटच वेगळा. दरवर्षी गणेश जयंतीला (Ganesh Jayanti) थाटात माटात इनाम धामणी गावात तिचा वाढदिवस साजरा केला जातो. तिच्या या वाढदिवसाला फक्त घरातीलच नाही तर गावातील नागरीक हजेरी लावतात. ऐश्वर्या ही कोणी मुलगी नसून एक रिक्षा आहे जीचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला जातो.

रिक्षाचालक अशोक मलमे यांची रिक्षा (Aishwarya Auto)म्हणजे गावकऱ्यांसाठी एक संजीवनी आहे. केवळ प्रवास हाच फक्त उद्देश नसून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या अशोक मलमे यांच्या रिक्षाचा सलग चार वर्षे प्रथम क्रमांक आला. तेव्हापासून त्यांनी रिक्षाचे नाव ऐश्वर्या ठेवले. काल (ता.४) ऐश्वर्याचा सहावा वाढदिवस होता. मलमे आणि त्यांच्या रिक्षाला शुभेच्छा देण्यासाठी गावातील सरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात मलमे यांनी अनेक ठिकाणी सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

अशोक मलमे हे गेली तीस वर्ष रिक्षा चालवत आहेत. त्यांनी रिक्षा ही अतिशय सुंदर सजवली आहे. या रिक्षात थोर पुरुषाच्या प्रतिमा, प्रवाश्यांसाठी कुलर, लायटिंग ची सुविधा केली आहे. अशोक मलमे हे गेल्या तीस वर्षापासून अपंग लोकांसाठी मोफत सेवा देत आहेत. याशिवाय वृद्ध लोकांसाठी अर्धे भाडे घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT