Sangli APMC Market Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli APMC Election : काँग्रेस ९, शिवसेना ठाकरे गटाचा ४ जागांचा प्रस्ताव; महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत.

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत तिन्ही पक्षांकडून जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. काँग्रेसने ९ जागांचा प्रस्ताव ठेवला असून त्यामध्ये जत तालुक्यात पाच, तर मिरजेत चार जागांची मागणी आहे. शिवसेनेने सहावरून चार जागांची मागणी केली आहे. त्यापैकी दोन जागा अजितराव घोरपडे गटाला देण्याचा सेनेचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जितेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, मनोज शिंदे, शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, दिगंबर जाधव उपस्थित होते.

बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या जोरदार हालचाली होत आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. बाजार समितीसाठी विकास सोसायटी गट आणि ग्रामपंचायत गटातून पंधरा संचालक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.

काँग्रेसकडून नऊ जागांचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. जत तालुक्यात पाच जागा तर मिरज तालुक्यात चार जागा देण्यात याव्यात, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यामध्ये चर्चा होईल. जागांबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

बैठकीला विशाल पाटील यांची दांडी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अनुपस्थित होते. परंतु पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांकडे मिरज तालुक्यासाठी चार जागा देण्याची मागणी केली आहे. जागा देताना अन्य कोणत्याही नेत्याने हस्तक्षेप करू नये, असा प्रस्ताव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Exits WHO : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून पूर्णपणे बाहेर, जिनेव्हातील ध्वजही उतरवला, ट्रम्प यांना तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Republic Day : प्रजासत्ताकदिनी शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आदेश

धक्कादायक! मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकांत लपवलेले 7.7 किलो कोकेन; आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, चिलीचा नागरिक अटकेत

Latest Marathi News Live Update : प्रजासत्ताक दिनी गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार नंदुरबार येथे ध्वजारोहण

Pune Grand Tour : पुणे ग्रॅंड स्पर्धेत लाखमोलाच्या सायकलींची साथ; अत्याधुनिक आणि लाखो रुपयांच्या सायकलींचीचुरस

SCROLL FOR NEXT