sangli crime case
sangli crime case 
पश्चिम महाराष्ट्र

Crime : बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटलांच्या खूनाचा अखेर छडा, कारण आलं समोर...

सकाळ वृत्तसेवा

माणिकराव पाटील यांचे १३ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आले होते.

सांगली : बांधकाम व्यवसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४, रा. इंद्रनील प्लाझा अपार्टमेंट, राम मंदिरजवळ, सांगली) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांच्या संयुक्त पथकाला बाराव्या दिवशी यश आले. कारंदवाडी (ता. वाळवा) येथील किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत ऊर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (वय २२), अभिजीत चंद्रकांत कणसे (वय २०) या तिघांना अटक केली. तिघांना पैशाची गरज होती. त्यामुळे अपहरण करून पैसे मागण्याचे ठरवले होते. झटापटीत ते बेशुद्ध पडल्यानंतर ते मृत झाले असावेत समजून नदीत टाकल्याची कबुली तिघांनी दिली. (sangli crime case)

खुनाचा छडा लागल्यानंतर माहिती देताना अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, माणिकराव पाटील यांचे १३ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांचा शोध घेऊन १५ रोजी त्यांच्या अपहरणाची फिर्याद दिली. तर १७ रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात आढळल्यानंतर खून झाल्याचे उघड झाले. हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांना सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथक तपासात होते.

आरोपींनी अपहरण करण्यापासून ते खून करण्यापर्यंत कोणताही पुरावा सोडला नव्हता. त्यामुळ तपासाचे आव्हान होते. पैशाच्या कारणातून हा खून झाला असावा असा आमचा प्रथमपासून संशय होता. तपासात तो खरा ठरला. खुनाच्या तपासासाठी जवळपास २०० ते ३०० जणांची चौकशी करण्यातआली. अखेर गोपनीय खबरे आणि तांत्रिक तपासातून तिघांची नावे समोर आली. सुरवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतू कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

गेडाम पुढे म्हणाले, अटक केलेला किरण रणदिवे, अनिकेत दुधारकर, अभिजीत कणसे या तिघांना पैशाची गरज होती. किरण याने काहीजणाकडून पैसे घेतले होते. त्यांनी पैशाचा तगादा लावला होता. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने अनिकेत व अभिजीत या दोघांना बोलवून कोणाचे तरी अपहरण करून पैसे मागण्याचे ठरवले. बांधकाम व्यवसायिक माणिकराव पाटील हे तुंग येथील नाष्टा सेंटरवर येत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती होती. त्यामुळे चोरीच्या मोबाईलवरून त्यांना कॉल करून प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून बोलवून घेतले.

माणिकराव तेथे आल्यानंतर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. माणिकराव यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली. माणिकराव दंगा केल्यानंतर कोणीतरी बघेल म्हणून तोंड दाबून हातपाय बांधले. त्यामध्ये माणिकराव बेशुद्ध झाले. तेव्हा तिघांनी त्यांचे हात दोरीने बांधून त्यांच्याच मोटारीच्या डिकीत टाकले. त्यानंतर त्याना कवठेपिरान येथे नेताना डिकी उघडून बघितली. कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यामुळे ते मृत झाले असावेत असे समजून कवठेपिरान, दुधगाव येथून कुंभोज पुलावरून माणिकराव यांना नदीत टाकले. तर मोटार कोंडिगे फाटा येथे सोडून दिली.

पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता. अखेर पोलिसानी गेले १२ दिवस रात्रंदिवस तपास करून छडा लावला असल्याचे अधीक्षक श्री. गेडाम यांनी सांगितले. अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक अजित टिके, निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक शिवाजी गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

यांची विशेष कामगिरी

गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलिस अंमलदार संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलवडे, बिरोबा नरळे, सागर टिगरे, अनिल कोळेकर, चेतन महाजन यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB Live Score : विराटचं शतक हुकलं मात्र आरसीबीनं उभारल्या 241 धावा

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

SCROLL FOR NEXT