Crime News
Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : बालिकेवर अत्याचार; वृद्धास कारावास

राजेश नागरे

सांगली : बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्ञानदेव महादेव चव्हाण (वय ६८) या आरोपीस कलम ३७६ (अ, ब) आणि ‘पोक्सो’ कायदा कलम ८ प्रमाणे दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्यांची सश्रम कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. महात्मे यांनी आज ही शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश त्यांनी दिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, ही घटना २०१९ च्या डिसेंबर महिन्यात घडली होती. आठवर्षीय पीडित बालिका आरोपीच्या घरासमोर खेळत असताना आरोपी चव्हाण याने तिला घरामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. त्यानंतर पुन्हा त्याने या बालिकेस घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत पीडित बालिकेच्या आईस समजल्यानंतर त्यांनी पलूस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून आरोपी ज्ञानदेव चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी पलूस पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेचा, तिच्या आईचा, डॉक्टरांचा जबाब नोंदविला यावरून जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडितेचा, तिच्या आईचा व डॉक्टरांचा जबाब, तपासी अधिकारी यांचा पुरावा व न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळेचा अहवाल या सर्वांचा विचार करून आरोपी चव्हाण याला कलम ३७६ (अ ब) आणि ‘पोक्सो’ कायदा कलम ८ नुसार दोषी धरण्यात आले.

या खटल्यात पलूस ठाण्याचे पोलीस हवालदार पठाण, पैरवी कक्षातील महिला पोलीस सुनीता आवळे आणि वंदना मिसाळ व जिल्हा न्यायालयाच्या पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT