sangli district bank election sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : महाआघाडीला ‘कपबशी’, भाजपला ‘विमान’

चिन्ह वाटपानंतर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरूः मतदारांकडून प्रचारास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलला कपबशी तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला विमान चिन्ह देण्यात आले. तसेच इतर १२ उमेदवारांना अन्य चिन्हांचे वाटप आज करण्यात आले. चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी तत्काळ प्रचारास प्रारंभ केला आहे. मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात खानापूरमधून आमदार अनिल बाबर, शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक, पलूसमधून महेंद्र लाड हे तीन विद्यमान संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. २१ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरीत १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी १८ जागांवर उमेदवार उभे केलेत. तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार रिंगणात आहेत. आज चिन्ह वाटपवेळी शेतकरी विकास पॅनेलने विमान चिन्ह तर सहकार पॅनेलने कपबशी चिन्ह मागणीनुसार दिले.

सहकार पॅनेलचे उमेदवार असे : सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ- अजितराव घोरपडे, जत- विक्रमसिंह सावंत, तासगाव- बी.एस. पाटील, मिरज- विशाल पाटील, वाळवा- दिलीप पाटील, कडेगाव- मोहनराव कदम, महिला राखीव- जयश्री पाटील, अनिता सगरे, अनुसूचित जाती- बाळासो होनमोरे, ओबीसी- मन्सूर खतीब, भटक्या जाती- ॲड. राजेंद्र डांगे, इतर शेती संस्था- वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था- सुरेश पाटील, नागरी बँका व पतसंस्था- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था- हणमंत देशमुख, सुनिल ताटे.

शेतकरी विकास पॅनेल उमेदवार असे : सोसायटी गट : आटपाडी- राजेंद्र देशमुख, जत- प्रकाश जमदाडे, तासगाव- सुनिल जाधव, मिरज- उमेश पाटील, वाळवा- भानुदास मोटे, कडेगाव- तुकाराम शिंदे, महिला- संगीता खोत, दिपाली पाटील, अनुसूचित जाती- रमेश साबळे, ओबीसी- तम्मनगौडा रवि, भटक्या जाती- परशुराम नागरगोजे, प्रक्रिया संस्था- चंद्रकात पाटील, नागरी बँक व पतसंस्था- अजित चव्हाण, राहुल महाडिक, मजूर संस्था- संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख.

अन्य उमेदवारांमध्ये कवठेमहांकाळ गटात - विठ्ठल पाटील (चिन्ह छत्री), तासगाव- प्रताप पाटील (नारळ), अनुसूचित जाती- विलास बेले (सिलिंग फॅन), नितीन काळे (बॅट), कल्लू कामत (कॅमेरा), ओबीसी- मुजीर जांभळीकर (ऑटो रिक्षा), सुयोग सुतार (पतंग), भटक्या जाती- शंकर माने (जीपगाडी), इतर संस्था- शंकर पाटील (अंगठी), तानाजी पाटील (मशाल), बँका व पतसंस्था- किशोर पाटील (मोटारगाडी), मजूर संस्था- शंकर माने (जीपगाडी) याप्रमाणे चिन्ह वाटप झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT