परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे खोळंबली  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : परतीच्या पावसामुळे काढणी खोळंबली

भात पीक झाले जमीनदोस्त; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, शिराळा तालुक्यातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

सांगली : शिराळा तालुक्यात रोज रोज पडणाऱ्या परतीचा पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी खोळंबली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले भाताचे पीक कोलमडून पडले असून शेतात पाणी साचल्याने काही ठिकाणी भातपिकास मोड आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अगोदरच वारणा नदीकाठावरील खरीप कुजून गेला. त्यातून उरला सुरलेला नदीकाठचा परिसर वगळता शेतशिवरतील खरीप काढणीला आला असून परतीच्या पावसामुळे त्याची देखील धूळधाण झाली आहे. भात पीक जमीनदोस्त झाले तर भुईमुंगाच्या शेंगांना मोड आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती धरणीला टेकली असून, भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भात शेतीचे आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शिराळा पश्चिम भागात सध्या भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची काढणी सुरू असून रोज पडणाऱ्या पावसामुळे ती खोळंबली आहे. भातपीक काढण्याचा हंगाम उलटला तरी परतीच्या पावसाने भात पिकावर पाणी फिरवले. ढगफुटीसदृश पावसामुळे शेतात उभं असलेल्या भात पिकांची धूळधाण झाली आहे. शेतकऱ्यांना पिके काढता येत नसल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. अगोदर अतिवृष्टी व आता परतीचा पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ऐन काढणीच्या मोसमात आलेली पिके परतीच्या पावसाने गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे.

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने आता पुन्हा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. पीक कुजून जाण्याच्या मार्गावर तालुक्यात १२ हजार ९०० हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. त्यातील साधारणपणे ६ हजार ५०० हेक्टर वरील खरीप महापुरामुळे अगोदरच कुजून गेला आहे. साधारणपणे ९० ते १२० दिवसांचे असणारे भात पीक अजूनही शेतातच असून तेही कुजून जाण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT