मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली
मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : महापालिका इमारतीबरोबरच कृषी भवनही बांधणार ; विश्वजित कदम

सकाळ वृत्तसेवा

सांगली: महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीबरोबरच कृषी भवनाची इमारतही उभी करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाला. मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महापालिका इमारतीसाठी अडीच एकर आयताकृती जागा उपलब्ध होती. तथापि, ती चौकोनी क्षेत्रफळाची असावी, यासाठी कृषी विभागाच्या जागेशी अदलाबदल केली आहे.

महापालिकेसाठी मध्यवर्ती इमारत असावी, यासाठी गेले काही वर्षे चर्चा होती. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच मध्यवर्ती ठिकाणी इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. तसा प्रस्ताव होता, मात्र तो दीर्घकाळ लांबत निघाला होता. सध्याच्या ताब्यातील जागेत आयताकृती जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, रस्त्यावरून ही इमारत दिसावी, अशी वास्तुरचना असावी, असा आग्रह झाल्यावर पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्याकडे तशी मागणी करण्यात आली. मुंबईतील बैठकीनंतर श्री. कदम म्हणाले, ‘‘जिल्ह्यासाठी पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने भव्य जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालय, न्यायालय इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.

आता महापालिका इमारत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय कामकाजासाठी सोयीचे होईल. त्याबरोबरच जिल्ह्याचे कृषी भवन बांधकामासाठी सर्वसाधारणपणे २५ हजार ते ३० हजार चौरस फुटांचे फर्निचरसह बांधकाम होणार आहे. जिल्हा नियोजनमधून सुमारे १० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या दोन्ही इमारती जलद पूर्ण होतील.’’ या वेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT