पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात टाळेबंदी सोमवारपर्यंत वाढली; जयंत पाटलांची माहिती

जयसिंग कुंभार,

सांगली : कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टाळेबंदी (sangli lockdown) आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. गेल्या पाच मेपासून १५ मेपर्यंत टाळेबंदी होती. आज पालकमंत्री जयंत पाटील (Guardian Minister Jayant Patil)यांनी आज लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगवरून जाहीर केला. सोमवारी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी जाहीर केले.आज सायंकाळी पाच वाजता मागील टाळेबंदीची मुदत संपणार होती. त्यामुळे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

sangli lockdown Increased until Monday update marathi news

पालकमंत्री पाटील यांनी आज कोरोना सध्यस्थितीचा आढावा ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत कृषी राज्यमंत्री कदम यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीपासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का याबाबत चर्चा करावी, असे सूचवले.

जयंत पाटील म्हणाले,‘‘ कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड डेडिकेटेड ठेवावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या ठिकाणी त्या रुग्णांना लाभ देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करु. रुग्ण मृत्यूची संख्या जास्त असलेल्या हॉस्पिटल्स पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करून घेतात. त्यांचे ऑडिट होणे अवश्य आहे. ’’

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी म्हणाले,‘‘ सध्या पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर असून दररोज पाच ते सहा हजार कोरोना चाचण्या होत आहे. रोजची बाधितांची संख्या १४०० पर्यंत आहे. ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून ८७ रुग्णालयात कोविड उपचारांसाठी सुविधा उपलब्ध आहे. यापेक्षा रुग्णालयांची संख्या वाढल्यास त्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे कठीण होईल. रुग्णसंख्या नियंत्रणांसाठी टाळेबंदीसह कडक निर्बंधांची आणखी गरज आहे. कोरोना हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा केली जाईल.’’

sangli lockdown Increased until Monday update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT