Sangli Lok Sabha Congress state president Nana Patole esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha : खांद्यावर हात टाकत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विशाल पाटलांना दिला महत्त्वाचा 'कानमंत्र'

महाराष्ट्रात काँग्रेसने तेरा लोकसभा मतदार संघात विजय मिळवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात काँग्रेसने तेरा लोकसभा मतदार संघात विजय मिळवला आहे. त्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा आणि बैठक आज मुंबईत पार पडली.

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघातून विशाल पाटील (Vishal Patil) यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांचा सत्कार केला. तेव्हा पटोलेंनी विशाल यांच्या खांद्यावर हात टाकत ‘कानमंत्र’ देखील दिला. यावेळी आमदार विश्‍वजित कदम यांच्या कामाचा गौरवदेखील करण्यात आला.

महाराष्ट्रात काँग्रेसने तेरा लोकसभा मतदार संघात विजय मिळवला आहे. त्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा आणि बैठक आज मुंबईत पार पडली. नाना पटोले यांच्यासह काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, विश्‍वजित कदम आदी उपस्थित होते.

कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विशाल यांचा सत्कार करण्यात आला. विशाल यांनी कोंडीतून मार्ग काढत साकारलेल्या विजयाचे यावेळी विशेष कौतुक झाले. निवेदक नेत्याने ‘ सांगलीत, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही सांगलीचे टायगर आहोत, असे सांगणारे आणि ते सिद्ध करून दाखवणारे नेते,’ असा विश्‍वजित कदम यांचा परिचय करून दिला आणि विशाल यांच्यासह त्यांचाही गौरव करण्यात आला.

नाना पटोले यांच्या हस्ते विशाल यांचा सत्कार झाल्यानंतर विशाल यांनी पटोलेंसह सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. पटोलेंना विशाल यांचा हात खेचत त्यांना थांबवले आणि कानात काहीतरी सांगितले. हा कानमंत्र काय होता, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Troohy: अजिंक्य रहाणेवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले, मुंबईचा आजपासून छत्तीसगढविरुद्ध सामन्याला सुरुवात

Brahmin Farmers : ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या कूळ कायद्यातील जमीनी परत मिळाव्यात, ब्राम्हण महासंघाची मागणी

BMCसाठी भाजपचा दीडशे पारचा नारा अन् शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; कारण काय?

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT