In Sangli- Miraj, these road-malls, complexes will remain closed 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली- मिरजेत हे रस्ते-मॉल्स, कॉम्पलेक्‍स राहणार बंद 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः महापालिका क्षेत्रात काय बंद व काय सुरु याचा खुलासा प्रशासनाने रात्री उशिरा केला. आयुक्त नितिन कापडणीस यांनी व्यापारी नेत्यांशी चर्चा करून ही यादी जाहीर केली. त्यानुसार बंद राहणाऱ्या व्यापार पेठा, मॉल्स, कॉम्पलेक्‍स, रस्ते याची यादी प्रसिध्द करण्यात आली. 

त्यानुसार बंद राहणाऱ्या पेठा, कॉम्पलेक्‍स तसेच मॉल्समधील अत्यावश्‍यक सेवा व अत्यावश्‍यक दुकाने मात्र सुरु राहणार आहेत. तथापि एकाकी दुकाने रहिवास विभागातील दुकाने आणि रहिवास संकुलातील दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र कंटेनमेंट झोनमधील जीवनावश्‍यक वस्तु व अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवहार बंद राहतील. 

हे बंदच राहणार... 

प्रभाग समिती एक कॉम्पलेक्‍सः गणेश मार्केट, बिपिन मार्केट, एसएफसी मॉल, सिंधी मार्केट, दासराम केळकर शॉपिंग सेंटर, मदनभाऊ कॉम्पलेक्‍स, चाफळकर कॉम्पलेक्‍स, पडसलगीकर कॉम्पलेक्‍स, कुबेर चेंबर्स, डुबल कॉम्पलेक्‍स, साई रेजिन्सी बिल्डिंग, ठक्कर कॉम्पलेक्‍स, मटण मार्केट, शिव मेरिडियन, कमल प्लाझा, वि. स. खांडेकर वाचनालय, सिलाई कॉम्पलेक्‍स, धर्मरत्न कॉम्पलेक्‍स (पटेल चौक), सीता नारायण कॉम्पलेक्‍स (जैन खानावळीजवळ), चंकेश्‍वरी कॉम्पलेक्‍स (हायस्कुल रोड), यशस्वी चेंबर्स (हायस्कुल रोड), वासुदेव चेंबर्स (वखार भाग), युनिटी स्टोअर्स (वखारभाग), तिरुपती चेंबर्स (वखार भाग), दावडा जैन मंदिर (हायस्कुल रोड), कृष्णा कॉम्पलेक्‍स, तरुण भारत कॉम्पलेक्‍स, गणपती पेठ- मोरया प्लाझा, श्रीराम चेंबर्स, सत्तार चेंबर्स, श्रीराम कृष्ण अपार्टमेंट, तारा टॉवर्स, श्री चेंबर्स. 


प्रभाग समिती एक व्यापारपेठा

शिवाजी मंडई, भाजी मंडई पेठभाग, कापड पेठ, गणपती पेठ, धान्य मार्केट, हरभट रोड, तरुण भारत स्टेडीयम ते स्टॅन्ड रोड, स्टॅन्ड रोड ते शिवाजी मंडई, पंचमुखी मारुती रस्ता, आझाद चौक ते राजवाडा चौक, झुलेलाल चौक ते शास्त्री उद्यान स्टॅन्ड परिसर, 

सांगली प्रभाग समिती दोन

वसंतदादा मार्केट मार्केट यार्ड, भंगार बाजार कोल्हापूर रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, शंभर फुटी रोड, डी मार्ट चौक, विश्रामबाग गणपती मंदीर रस्ता, विजय इंडस्ट्रीज चौक शंभर फुटी रस्ता, शंभर फुटी धामणी रोड, चांदणी चौक, नेमीनाथनगर परिसर, स्फृती चौक गव्हर्मेंट कॉलनी, पै प्रकाश हॉटेल चौक विश्रामबाग, जुना जकात नाका विश्रामबाग (खोकी), आलदर चौक ते एमएसईबी कॉर्नर, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर. 

मिरज प्रभाग समिती चार

बापूसाहेब जामदार कॉम्पलेक्‍स माधव टॉकीजवळ, ख्वॉजा शमना मिरा शॉपिंग सेंटर हायस्कुल रोड, महासाधू अण्णाबुवा शॉपिंग सेंटर पुर्व उत्तर हायस्कुल रोड, डी. टाईप शॉपिंग सेंटर, देवल कॉम्पलेक्‍स हायस्कुल रोड, एसटी स्टॅन्डजवळील महापालिकेचे गाळे, रेल्वे जंक्‍शनजवळील गाळे, तासगाव वेस कर्मवीर चौकातील गाळे, ऍक्‍सीस बॅंकेजवळ लोणी बाजार, गांधी चौकातील गाळे, 

मिरजेतील बाजारपेठा

 लक्ष्मी मार्केट आतील बाजू, गणेश मार्केट हॉकर्स, तांदूळ मार्केट मनपा कार्यालयासमोर, तांदूळ मार्केट मनपा कार्यालयाशेजारी, सराफ कट्टा पूर्व पश्‍चिम बाजू 

कुपवाड प्रभाग समिती तीन

 ऑरोम कॉम्पलेक्‍स विजयनगर, धोंडिकाका कॉम्पलेक्‍स पाण्याची टाकी कुपवाड, सत्राळकर कॉम्पलेक्‍स विजयनगर, सिटी फ्रेश कॉम्पलेक्‍स वसंतदादा कुस्तीकेंद्र रोड, 
मंगळवार बाजार-मार्केट, लक्ष्मी देवळाजवळील उत्तर बाजू. 

या अटी लागू 

  • सर्व दुकाने-आस्थापनांमध्ये उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक असेल. 
  • सुरक्षित अंतरासाठी दुकान-आस्थापनाबाहेर पाच फुट अंतरावर पट्टे आखावेत. 
  • पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 
  • आलेल्या व्यक्तींना हात धुण्यासाठी पाणी साबणाची व्यवस्था बंधनकारक 
  • स्पर्श टाळून देवाणघेवाणीचे व्यवहार बंधनकारक असतील. 
  • दुकाने आस्थापनांमधील पृष्ठभाग नियमितपणे निर्जंतूक करणे बंधनकारक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT