miraj esakal
पश्चिम महाराष्ट्र

आजींच्या लिफ्टचा थरार! चक्क महापालिकेच्या घंटागाडीला लटकून प्रवास

स्टेशन चौकातून आजीबाईंने घंटागाडीला लिफ्ट मागितली

सकाळ डिजिटल टीम

सांगली - जिल्ह्यातील मिरज (Miraj) येथे एका आजीच्या लिफ्टचा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. या आजीने सांगली (Sangli) महापालिकेच्या घंटा गाडीला लटकून प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरजेमध्ये या प्रवासाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांतून आर्श्चय व्यक्त होत आहे. मिरज शहरातील एका आजीबाईंचा या गाडीला लटकलेला थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.

मिरज (Miraj) शहरातील स्टेशन चौकातून विजयनगर पर्यंत गाडीला लटकून आजीबाईचा हा लिफ्टचा प्रवास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या घंटागाडीला लटकून या आजीबाईंनी प्रवास केला आहे. स्टेशन चौकातून आजीबाईने घंटागाडीला लिफ्ट मागितली आणि त्यानंतर घंटागाडी चालकाने आजीला मागे बसवण्यास सांगितले आणि आजीने गाडीच्या साईडला एका बाजूला उभा राहात तीन ते चार किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी मोबाईलमध्ये सदरचा प्रकार चित्रित केला आणि पुढे जाऊन ही गाडी थांबवून घंटागाडी चालकाची चांगलीच कान उघाडणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी! शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

Mumbai News: Gen-Z चं मोठं यश, मुंबईत मोर्चा होणारच; ठाकरे बंधूंनी दिली मोठी माहिती

Bedmi Puri: रविवारच्या स्पेशल नाश्त्यासाठी परफेक्ट मेजवानी; घरातच बनवा बनारसची जगप्रसिद्ध 'बेडमी पुरी'! काय आहे रेसिपी?

Accident News: भीषण अपघात! प्रवासी आणि गृह मंत्रालयाच्या बसची भीषण धडक; ३५ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त बांगरवाडीतील श्री गुप्त विठोबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ४ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

SCROLL FOR NEXT