sangli municipal corporation mayor deputy mayor resignation 
पश्चिम महाराष्ट्र

दादांचा आदेश पाळला; सांगलीच्या महापौर, उपमहापौरांचे राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा

सांगली : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मानून महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज महासभेत आपले राजीनामे सादर केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "इतर सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. आज महासभा संपण्यापूर्वीच दोघांनीही आपले राजीनामे आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सादर केले. 

महापालिकेत दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर महापौरपदी मिरजेच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सांगलीचे धीरज सूर्यवंशी यांची निवड केली होते. दोघांनाही एक वर्ष मुदत देण्यात येणार होती. मात्र विधानसभा निवडणूक तसेच ऑगस्टमधील महापूर आणि वर्षाखेरीस राज्यातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली. दोघांनीही दीड वर्ष आपल्या पदाची जबाबदारी सांभाळली. 

महापौरपद ओबीस महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतच हे आरक्षण असल्याने इतर महिला सदस्यांनाही संधी मिळावी अशी महिला सदस्यांची इच्छा होती. मात्र पक्षाचे नेते याबाबत कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपुर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना सोमवारच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश फोनवरुन दिले होते. आज महापालिकेत महासभेचे आयोजन केले होते. यामध्येच सायंकाळी दोघांनीही आपले पदाचे राजीनामे सादर केले. 

उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांनी आपला राजीनामा महापौर संगीता खोत यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो स्वीकारल्यानंतर स्वत:चा राजीनामा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सादर केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Murder Case: नातवाला संपवण्यापूर्वी बंडू आंदेकरचा सेफ प्लॅन उघड, नंबरकारी म्हणजे काय?

Pune News : लक्ष्मण हाके नवे कांशीराम म्हणून उदयास येत आहेत?

Yeola News : येवल्याच्या कन्येची जागतिक भरारी! वैष्णवी कातुरे हिच्या टीमचा ‘ड्रोन’ जागतिक स्पर्धेत तिसरा

Agriculture News : ‘नाफेड’चा कांदा बाजारात आल्यास ट्रक जाळू; शेतकऱ्यांचा शासनाला थेट इशारा

Nashik News : 'पाणी वाचवा' मोहीम फक्त कागदावरच? सिडकोतील वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटण्याच्या घटनांवर नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT