Sangli municipality fined to Domino's Pizza  
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेचा डॉमिनोझ्‌ पिझ्झाला दणका...

ससकाळ वृत्तसेवा

सांगली - जगभरात पिझ्झा खवैय्यांचे चोचले पुरवणाऱ्या डॉमिनोझ्‌च्या सांगली शाखेला इथल्या महापालिकेने दणका दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्या प्रकरणी महापालिकेने येथील शाखेला तब्बल तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याची पावती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून जो न्याय सामान्य सांगलीकरांना तोच बड्या ब्रॅंडला असा इशाराच यानिमित्ताने दिला आहे. 

कचरा टाकणाऱ्यांना थेट दंड

सांगलीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सुरु झाले आहे. गल्लोगल्ली फलक लावून महापालिका स्वच्छतेचे आवाहन करत आहे. शाळा, महाविद्यालयात उपक्रम राबवले जात आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. त्याला अद्याप फार मोठे यश आले नसले तरी महापालिकेने कसोसीने प्रयत्न चालवले आहेत. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना थेट दंड करून दणका देण्याचे धोरण राबवण्यात आले आहे. त्याला झटका डॉमिनोझ्‌ पिझ्झाला आज बसला आहे.

दंडाची पावती सोशल मिडीयावर व्हायरल

महापालिकेने पावती क्रमांक 106044 या क्रमांकाची पावती केली आहे. ती महापालिकेच्या अधिकृत फेसबूक पेजवर दिसत असून त्यावर बरीच चर्चा रंगली आहे. या पावतीसोबत येथील उषःकाल नर्सिंग होमलाही तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या दोन पावत्या महापालिकेने व्हायरल करत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे महागात पडेल, असा इशाराच दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT